शैक्षणिक परिसरात टवाळखोरीला ब्रेक! अमळनेर पोलिसांचा सक्त इशारा
1 min read

शैक्षणिक परिसरात टवाळखोरीला ब्रेक! अमळनेर पोलिसांचा सक्त इशारा

Loading

शैक्षणिक परिसरात टवाळखोरीला ब्रेक! अमळनेर पोलिसांचा सक्त इशारा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शाळा, महाविद्यालय नियमित सुरू झाल्यापासून पासून शाळा, महाविद्यालये व शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी रोडरोमिओ प्रतिबंध असावा या करीता अमळनेर पोलीस स्टेशन कडील वेग वेगळे पथक नियमित शाळा, महाविद्यालये यांना भेटी देऊन परिसरात गस्त करीत होते..
आज रोजी अमळनेर पोलीस स्टेशन कडील पथक गस्त करीत असताना ०७ टवाळखोर शाळा, महाविद्यालय परिसरात काही एक शैक्षणिक उद्देश नसताना शाळा महाविद्यालय परिसरात फिरत असताना मिळून आले आहेत. यावरून नमूद ०७ ही टवाळखोरांना योग्य ती कायदेशीर समज देऊन सोडून देण्यात आले आहे.
*तसेच कुणीही टवाळखोर यापुढे शैक्षणिक परिसरात विना शैक्षणिक उद्देश मिळून आल्यास तात्काळ अमळनेर पोलीस स्टेशनची संपर्क करण्याबाबत पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय निकम यांनी आव्हान केले आहे..*
नमूद कारवाई मा.पोलीस अधीक्षक सो.जळगाव, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सो, चाळीसगाव व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो अमळनेर यांच्या सूचना व आदेशाप्रमाणे तसेच मा. पोलीस दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक अमळनेर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाने पोलीस अंमलदार अमोल पाटील, प्रशांत पाटील, गणेश पाटील नितीन कापडणे, जितेंद्र निकुंभें यांच्या पथकाने केलेली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *