अग्रवाल परिवारातील सुकन्या यशवी झाली सी.ए.उत्तीर्ण  एकाच परिवारात सहा सी. ए.असलेला गुणी परिवार
1 min read

अग्रवाल परिवारातील सुकन्या यशवी झाली सी.ए.उत्तीर्ण एकाच परिवारात सहा सी. ए.असलेला गुणी परिवार

Loading

अग्रवाल परिवारातील सुकन्या यशवी झाली सी.ए.उत्तीर्ण

एकाच परिवारात सहा सी. ए.असलेला गुणी परिवार

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथे सामाजिक,शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या व उद्योग क्षेत्रात विशेष नावलौकिक प्राप्त केलेल्या बजरंगलाल अग्रवाल परिवारातील सुकन्या यशवी राधेश्याम अग्रवाल ही नुकतीच सी.ए.(चार्टड अकौंटट) ही अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे.
या परिवाराचे वैशिट्य म्हणजे या परिवारात आधी पाच जण सी. ए.झाले असून यशवी ही सहावी सी ए झाली आहे.यशवी चे वडील राधेश्याम अग्रवाल व काका नीरज अग्रवाल दोन्ही सी ए असून याव्यतिरिक्त काकू सौ ममता अग्रवाल तसेच मोठी बहीण आणि जिजाजी हे देखील सी ए आहेत.यशवीच्या सातत्यपूर्ण अभ्यासाने, कठोर परिश्रमाने आणि आत्मविश्वासाने हे यश तिने मिळवले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या यशामध्ये तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे, कुटुंबियांचे देखील अभिनंदन होत आहे.उद्योजक बजरंगलाल अग्रवाल यांची ती नात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *