विकासाभिमुख नेतृत्वाचा मानबिंदू – आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” समाजाचे ऋण मानणाऱ्या लोकप्रतिनिधीने अमळनेरच्या प्रगतीचा नवा इतिहास घडवला!
![]()
“विकासाभिमुख नेतृत्वाचा मानबिंदू – आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
समाजाचे ऋण मानणाऱ्या लोकप्रतिनिधीने अमळनेरच्या प्रगतीचा नवा इतिहास घडवला!
अमळनेर प्रतिनिधी
“आपण समाजाचे देणे लागतो” या भावनेने प्रेरित होऊन अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे आमदार तथा माजी मंत्री अनिल दादा पाटील हे आज तालुक्यातील प्रत्येक घटकाच्या हृदयात विश्वासाचे प्रतीक बनले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अनिल दादांनी आपल्या कार्यकाळात अमळनेर शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, कृषी, सिंचन, क्रीडा आणि सांस्कृतिक सुविधा यामध्ये उल्लेखनीय बदल घडवून आणले आहेत.
विशेषतः पाडळसरे धरणास मिळालेली वरिष्ठ पातळीवरील मंजुरी ही अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी बाब ठरली आहे. यामुळे सिंचनाची क्षमता वाढून शेतीला नवा उभारी मिळणार आहे.
दादांच्या नेतृत्वामुळे शहरामध्ये जलसंपदा, आरोग्य केंद्रे, शैक्षणिक इमारती, दर्जेदार रस्ते अशा अनेक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असून, “अमळनेर बदलतोय” हे जनतेचे स्वप्न प्रत्यक्षात येताना दिसते आहे.
सामाजिक न्याय, ग्रामीण विकास व शेतकरी कल्याणाच्या दृष्टीने त्यांनी घेतलेल्या निर्णयांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात घर केलं आहे.
त्यांचा नेतृत्वाभिमुख, लोकसंग्राहक आणि अभ्यासपूर्ण कार्यपद्धतीमुळे अमळनेरचा विकास ही केवळ घोषणा न राहता वास्तव ठरत आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, यशस्वी दीर्घायुष्य आणि नव्या उंची गाठण्याच्या शुभेच्छा दिल्या जात असून, “दादांचे नेतृत्व लाभले म्हणून अमळनेर भाग्यवान!” अशी जनतेची भावना आहे.
🎉🎂💐 “आ. अनिल दादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” 💐🎂🎉
– शुभेच्छुक:
सौ. स्वप्ना विक्रांत पाटील
(सामाजिक कार्यकर्त्या)
(प्रभाग क्र. १७ अ, वड चौक, अमळनेर)
व माजी नगरसेवक नानासाहेब विक्रांत पाटील, अमळनेर

