आमदारांनी केलेला सत्कार प्रेरणा देणारा ठरणार उमेश काटे : अमळनेरला आमदार सत्यजित तांबे यांची भेट
![]()
आमदारांनी केलेला सत्कार प्रेरणा देणारा ठरणार
उमेश काटे : अमळनेरला आमदार सत्यजित तांबे यांची भेटअमळनेर – वरिष्ठ सभागृहाचे आमदार सत्यजित तांबे यांनी माझ्या निवासस्थानाला पदस्पर्श करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी केलेला आत्महृदयी सत्कार हा आयुष्यभर प्रेरणा देणारा ठरणार आहे असे मत उमेश काटे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
अमळनेर तालुका फ्रुट सोसायटीच्या संचालक पदी नुकतीच उमेश काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन विशेष सत्कार केला. तसेच आर्मी स्कुलच्या नूतन प्राचार्यपदी अनिल पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दलही आमदारांनी सत्कार केला. दरम्यान यावेळी आमदार सत्यजित तांबे यांचा शिवशाही फाउंडेशनकडून सत्कार करण्यात आला. यावेळी नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड, जेष्ठ मान्यवर राजेंद्र सुर्वे, विद्यानिकेतनच्या प्राचार्या सुनीता गरुड, अनिता सुर्वे, आर्मी स्कूल चे प्राचार्य अनिल पाटील, शिवशाही फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे, साने गुरुजी विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक देवेंद्र महाजन, तालुका गणित मंडळाचे गोपाल हडपे, क्रीडा शिक्षक आर ए घुगे, शिक्षण निदेशक बी पी पाटील, उपक्रमशील शिक्षक दीपककुमार पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बाविस्कर आदी उपस्थित होते.शिक्षकांचे आमदारांना साकडे
अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलच्या शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन झालेले नाही. शिक्षकांच्या वेतनासाठी सुमारे दोन लाखाच्या निधीची कमतरता भासत आहे. पर्यायाने वेतन नसल्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील आर्मी स्कूलच्या शिक्षकांनी आमदार सत्यजित तांबे यांना साकडे घातले. त्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी पुणे येथील संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत वेतन निधीचा प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले.
——–
अमळनेर – तालुका फ्रुट सोसायटीचे नूतन संचालक उमेश काटे यांचा सत्कार करताना आमदार सत्यजित तांबे. शेजारी प्रा सुनील गरुड, अनिल पाटील, जयेशकुमार काटे आदी मान्यवर

