जळगावमध्ये 39 कोटींच्या पीएफ निधीची गती थांबली, शिक्षकांचे आर्थिक भविष्य धोक्यात अधिकारी टाळाटाळ करत, सेवानिवृत्त शिक्षकांचे लाखो रुपये अडकले; पगार आणि अनुदान प्रलंबित माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रकरणांवर आंदोलनाचा इशारा
![]()
जळगावमध्ये 39 कोटींच्या पीएफ निधीची गती थांबली, शिक्षकांचे आर्थिक भविष्य धोक्यात
अधिकारी टाळाटाळ करत, सेवानिवृत्त शिक्षकांचे लाखो रुपये अडकले; पगार आणि अनुदान प्रलंबित
माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रकरणांवर आंदोलनाचा इशारा
जळगांव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात आर्थिक केली जात असल्याचा आरोप जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने केला आहे. जिल्ह्यातील 180 सेवानिवृत्त झालेले माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे हक्काचे भविष्य निर्वाह निधी- पी. एफ्. चे सुमारे 39 कोटी रुपये अजूनही मिळालेले नाहीत. एक जून पासून पाठपुरावा करुनही वेगवेगळे कारण सांगून पीएफचे बिल कोषागार कार्यालयात सादर करण्यास वेतन पथक अधीक्षक व शिक्षणाधिकारी टाळाटाळ करीत आहेत. अनेक दिवस वेतन पथक अधीक्षक यांनी बिलांवर सह्या करण्यास विलंब केला. बिल तयार करून कर्मचारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी गेला असता त्यांनी स्वाक्षरी न करता ऑनलाइन बिल सादर करावयास सांगितले. तीन दिवसापासून ऑनलाइन बिल सादर होत नसल्याने सेवानिवृत्त शिक्षकांचे हक्काचे लाखो रुपये अडकून पडले आहेत. अधिकाऱ्यांच्या तू तु मय मय मुळे शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. माहे मे महिन्याचा 134 शाळांचा पगार २० जून आली तरी देखील प्रलंबित आहे. 180 शाळांचे वेतनेतर अनुदान देखील अदा करण्यात आलेले नाही. 31 मार्च पूर्वी अनुदान उपलब्ध होऊनही अनुदान वितरणासाठी प्रचंड विलंब करण्यात आलेला आहे.
जिल्हा शैक्षणिक व्यासपीठामार्फत या सर्व प्रकारची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. माध्यमिक शिक्षण विभागात प्रलंबित असलेल्या मान्यता, विविध प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे, ना हरकत दाखले मिळण्यासाठी विलंब होत असल्याने शिक्षकांची आडवणूक करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने दिलेला आहे. असे पिठाचे अध्यक्ष जे.के. पाटील, समन्वयक एस्. डी. भिरुड, मुख्याध्यापक, संस्थाचालक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक महासंघ, जुनियर कॉलेज संघ, शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघ, इब्टा शिक्षक, जळगाव महानगर माध्यमिक शिक्षक संघ , कलाध्यापक संघ या संघटनांचे पदाधिकारी…..
गोपाळ पाटील,बाळासाहेब पाटील, ए जी इंगळे, साधना लोखंडे, सुनिल गरुड, नंदन वळीकार,शैलेश राणे, सुनील सोनार, राजेश जाधव, प्रदीप साखरे, संजय निकम, योगेश भोईटे, संदीप डोलारे, आर आर धनगर, प्रदीप वाणी , सुनील तायडे, एन्. ओ. चौधरी, अरुण सपकाळे, यु. यु. दादा पाटील,आर्. एच्. बाविस्कर, संभाजी पाटील, सी. सी. वाणी, पुष्पा पाटील यांनी कळविले आहे.

