ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात उत्साहातील प्रवेशोत्सव: नव्या विद्यार्थ्यांचे रंगीन स्वागत!**
1 min read

ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात उत्साहातील प्रवेशोत्सव: नव्या विद्यार्थ्यांचे रंगीन स्वागत!**

Loading

ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात उत्साहातील प्रवेशोत्सव: नव्या विद्यार्थ्यांचे रंगीन स्वागत!**

जळगाव प्रतिनिधी

आज दिनांक 16 जून 2025 सोमवार रोजी *के सी ई सोसायटी संचलित, ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय , जळगाव* येथे “*प्रवेशोत्सव*” उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे तसेच पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे यांच्या हस्ते औक्षण करून व पुष्पगुच्छ देऊन ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच शाळेच्या प्रांगणात प्रवेश करताना विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप सुद्धा करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना *ए टी झेड मिरर* या वार्षिक अंकाचे सुद्धा वाटप करण्यात आले. समग्र शिक्षा अभियान तर्फे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले यासाठी केसरी सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री शशिकांत वडोदकर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गुरुवर्य प.वि. पाटील प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ई पी पाचपांडे सर, सौ सुचिता बाविस्कर, श्रीमती मंगला गोठवाल, सौ हेमलता भोळे, श्री डी ए पाटील, श्री विवेक मोरे, सौ रोशनी कोळी श्रीमती स्मिता शेंडगे ,श्री पराग राणे यांनी सुद्धा सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *