दमदार पावसात शाळेची सुरुवात! नवे शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुरू.
1 min read

दमदार पावसात शाळेची सुरुवात! नवे शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुरू.

Loading

दमदार पावसात शाळेची सुरुवात!
नवे शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुरू.

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

महाराष्ट्रातील विदर्भ सोडता सर्व जिल्ह्यात आज नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. या नव्या शैक्षणिक वर्षाचे महत्व म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पहिलीपासून 2025 – 2026 या वर्षांमध्ये होत आहे. त यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली आणि आज शाळेच्या पहिल्या दिवशी मुसळधार पाऊस जणूकाही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हजर होता. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तकाचे वाटपाचे नियोजन लवकरच केले यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. पहिल्याच दिवशी पुस्तके विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जे धोरण अवलंबले होते या धोरणाला कात्री शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लावल्यामुळे यावेळी जी पुस्तक उपलब्ध आहेत त्या पुस्तकांमध्ये कोरी पाने नसल्याचे दिसून आले. यावर्षी हिंदी भाषा हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे त्याबद्दल काय धोरण आहे हे लवकरच लक्षात येईल मुंबईतील उपनगरातील शाळेतील शिक्षक धर्मेंद्र राठोड यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्याने म्हणले शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे धोरण नक्कीच महाराष्ट्राला प्रगतीपत्रावर नेईल. अंधेरी पश्चिम शिक्षण विभागाच्या समन्वयक अनिता मोरे यांनी उपनगरातील अनेक शाळेत भेट देऊन शासनातर्फे देण्यात येणारी पुस्तके विद्यार्थ्यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *