डॉ.प्रदीप साखरे एक क्षण गौरवाचा 2025 ने सन्मानित.
1 min read

डॉ.प्रदीप साखरे एक क्षण गौरवाचा 2025 ने सन्मानित.

Loading

डॉ.प्रदीप साखरे एक क्षण गौरवाचा 2025 ने सन्मानित.

जळगांव प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आई दादा प्रतिष्ठान व भाजप अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ यांच्यातर्फे भुसावळ तालुक्यातील सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एक क्षण गौरवाचा 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात नामदार संजय सावकारे वस्त्र उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री भंडारा यांच्या हस्ते म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चे क्रीडा शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे यांना क्रीडा व सामाजिक कार्याबद्दल एक क्षण गौरवाचा 2025 पुरस्कार सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी भुसावळ चे माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, भाजप शहराध्यक्ष किरण कोलते,संदीप सुरवाडे, तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील,गोलू पाटील,जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा चे नागेश्वर साळवे आई-दादा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राहुल तायडे आदी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *