लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा उरुळी कांचनचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न
1 min read

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा उरुळी कांचनचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

Loading

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा उरुळी कांचनचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

पुणे प्रतिनिधी

लोकमंगल ही एक संस्था किंवा एक समूह नाही तर सामाजिक चळवळ म्हणून कार्य करत आहे. सभासद यांनी लोकमंगल पतसंस्थेवर टाकलेल्या विश्वावासामुळे आज लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज प्रगतीपथावर चालू आहे. वर्षभरात अनेक स्तुत्य विधायक समाजोपयोगी उपक्रम प्रत्येक शाखेत राबविले जातात. सभासद बांधवांच्या व महिलांच्या साठी अनेक योजना राबविल्या जातात आपण त्यांचा लाभ आवश्यक घेतला पाहिजे. लोकमंगलच्या सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक कार्याची माहिती लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक शिवाजी माळी यांनी दिली. शाखा उरुळी कांचन लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सल्लागार तथा जेष्ठ समाजसेवक हभप डॉ रविंद्र भोळे उपस्थित होते. तसेच पुणे विभागीय अधिकारी कमलाकर पाटील, उरुळी कांचनचे शाखाधिकारी अभिजीत साखरे, लोणी काळभोर शाखेचे शाखाधिकारी मारुती चौगुले, गुलटेकडी शाखेच्या शाखाधिकारी लक्ष्मी माळी, सासवडच्या शाखाधिकारी स्वाती बोरकर, पत्रकार सुनिल तुपे, सल्लागार नंदकुमार मुरकुटे, अशोक कदम, परिघा कांचन, शुभांगी परिट, अक्षदा कांचन, अलका मदने, संस्थेचे कर्मचारी मयुरी बोडके, सोनाली वाले, अनिकेत जगताप, महेश फुलझळके, सभासद ताराचंद तलरेजा, कर्मचारी वृंद, सभासद, सल्लागार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक शिवाजी माळी यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल भोसले यांनी केले आभार शाखाधिकारी अभिजीत साखरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *