शैला बैसाणे यांना इंडियन एक्सलन्स अवार्ड – २०२५ पुरस्काराने सन्मानित
1 min read

शैला बैसाणे यांना इंडियन एक्सलन्स अवार्ड – २०२५ पुरस्काराने सन्मानित

Loading

शैला बैसाणे यांना इंडियन एक्सलन्स अवार्ड – २०२५ पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी
नविन माध्यमिक विद्यालय अंतुली,-रंजाणे ता. अमळनेर, जि. जळगाव येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शैला गंगाधर बैसाणे यांना
इंडियन एक्सलन्स अवार्ड – २०२५ पुरस्काराने गौरविण्यात आले.
शैला बैसाणे हे गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांच्या कामाची दखल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व अहिल्या राज वर्धापन दिनाच्यानिमित्ताने घेण्यात आली.
यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारामुळे त्यांना सर्वत्र मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व अहिल्या राज वर्धापन दिनाच्या निमित्ताने इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५ सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन अहिल्या राज व हिंदी मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध क्षेत्रांतील २६० कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
इंडियन एक्सलन्स अवॉर्ड सोहळा उत्साहात
ऑनलाइन माध्यमातून आलेल्या ७०० प्रस्तावांमधून उत्कृष्ट कार्यासाठी २६० जणांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय काजळे, तर उद्घाटक हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष घनश्री काटीकर पाटील होत्या. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मंत्रालय मुंबई सहा. माहिती आयुक्त निलेश तायडे, मलकापूर ग्रामीण ठाणेदार संदीप काळे, अशांत वानखेडे (संस्थापक, समतेचे निळे वादळ), प्रसाद जाधव, प्रा. डॉ. अनिल खर्चे, फारुख शेख, वीरसिंग राजपूत, दामोदर शर्मा, गजानन ठोसर, संतोष पाटील आदींची उपस्थिती होती.
शैला बैसाणे यांना इंडियन एक्सलन्स अवार्ड – २०२५ पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल अमळनेर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू-भगिनी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले..

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *