कु. ऋतुजा सोनवणे यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५’ सन्मानित
1 min read

कु. ऋतुजा सोनवणे यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५’ सन्मानित

Loading

कु. ऋतुजा सोनवणे यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५’ सन्मानित

चोपडा प्रतिनिधी
शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकारी श्री हंसराज लहानू सोनवणे यांची कन्या, कु. ऋतुजा हंसराज सोनवणे, यांचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५’ बहुमानाने गौरव करण्यात आला आहे.
हातेड (ता. चोपडा) येथील रहिवासी आणि नाशिकमधील बी.वाय.के. वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी ऋतुजा सोनवणे या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या प्रतिष्ठित पुरस्काराच्या धारक ठरल्या आहेत.
हा पुरस्कार ३० मे २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसरात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. या सोहळ्याचा प्रमुख पाहुणे महाराष्ट्राच्या माजी आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे होते, तर अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरचे जिल्हाध्यक्ष श्री. अंकुशराव कदम यांची उपस्थिती होती.
या सोहळ्याचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटरकडेुन गेले २६ वर्षांपासून राज्यातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या युवक-युवतींचा गौरव करण्यासाठी केले जाते. ऋतुजा सोनवणे यांना रोख रक्कम ₹२१,००० आणि स्मृतीचिन्ह देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्व शिक्षकेतर जिल्हापदाधिकारी आणि तालुका पदाधिकाऱ्यांनी या सन्मानाबद्दल त्यांचे मनापासून कौतुक व्यक्त केले आहे.
हे आपल्या संस्थेसाठी आणि परिवारासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *