एआय तंत्रज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वरदान- अनिल बोरनारे  एआय मुळे शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत  राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या एआय कार्यशाळेचे अनिल बोरनारे यांच्या हस्ते उदघाटन
1 min read

एआय तंत्रज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वरदान- अनिल बोरनारे एआय मुळे शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या एआय कार्यशाळेचे अनिल बोरनारे यांच्या हस्ते उदघाटन

Loading

एआय तंत्रज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वरदान- अनिल बोरनारे

एआय मुळे शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या एआय कार्यशाळेचे अनिल बोरनारे यांच्या हस्ते उदघाटन

डोंबिवली (प्रतिनिधी) बदलत्या काळाचा विचार करता तंत्रज्ञानाशिवाय शिक्षण घेणे अशक्य असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन अनिल बोरनारे यांनी केले
राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली आयोजित शिक्षकांसाठी एआय कार्यशाळेचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमध्ये आयोजित करण्यात आले होते या कार्यशाळेचा शुभारंभ अनिल बोरनारे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी कार्यवाह शिरीष फडके सहकार्यवाह प्रमोद उंटवाले खजिनदार संजय दीक्षित मुख्याध्यापिका वैभवी सावंत मुख्याध्यापक सुरेश नारोळे शिक्षण क्रांती संघटनेचे कल्याण डोंबिवली अध्यक्ष गजानन पाटील तज्ज्ञ मार्गदर्शक जयेश पाटील व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते
एआय मुळे इतर क्षेत्रात कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो तसा शिक्षणक्षेत्रात होणार नसल्याचे सांगून कोणत्याही शिक्षकांची नोकरी जाणार नसल्याचे बोरनारे यांनी सांगितले
एआय च्या विविध टूल्सच्या माध्यमातून शिक्षक आपले अध्यापन प्रभावी करू शकतात राज्यात अनेक शिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शाळांचा कसा कायापालट केला याची अनेक उदाहरणे उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकांना दिली. नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यात जून पासून सुरु होणाऱ्या नविन शैक्षणिक वर्षांपासून सुरु होत असून त्यासाठी शिक्षकांनी सज्ज राहायला सांगून नविन शैक्षणिक धोरणात देशाला विश्वगुरु बनविण्याची क्षमता असून शिक्षकांवर मोठी जबाबदारी आली असल्याचेही बोरनारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *