डोंबिवली येथील पेंढारकर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा.* *पर्यावरण संरक्षणाची जागरूकता वाढवणे आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करणे.हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश आहे.: प्राचार्य सूर्यवंशी*
![]()
*डोंबिवली येथील पेंढारकर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा.*
*पर्यावरण संरक्षणाची जागरूकता वाढवणे आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करणे.हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश आहे.: प्राचार्य सूर्यवंशी*
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)5 जून रोजी के.व्हि.पेंढारकर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.सूर्यवंशी आणि उपप्राचार्य डॉ. लाहोर सर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य LT. प्रा.उदय नाईक उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षणाची जागरूकता वाढवणे आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. यानिमित्ताने के. वी. पेंढारकर महाविद्यालयाचे सर्व NCC कॅडेट्सनि उत्साहाने सहभाग घेऊन त्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. पर्यावरण रक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. CDT. प्रियांशु दुबे याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत विशेष अशी जबाबदारी पार पाडली. CDT. मुकेश चौधरी, CDT. श्रेया भंडारे , CDT. मिनाक्षी प्रजापती तसेच CPL सांत्वना गुप्ता व CDT. श्रेयस पाटील, CDT. उत्कर्ष सिंग,CDT. मंदार सुरडकर,CDT. आदित्य पाटील,CDT. संकेत मर्ढेकर ,CDT. हित मारू यांनी पोस्टर्स द्वारे पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले.सर्व प्रमुख पाहुण्यांनी NCC CADETS चे योग्य असे मार्गदर्शन केले.
एकूणच हा कार्यक्रम पर्यावरण विषयक जागरूकता वाढवण्यात आणि सकारात्मक कृतीला प्रोत्साहन देण्यात यशस्वी ठरला.

