डॉ विजया नेमाडे आणि नीलिमा महाजन यांना सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठित अहिल्याबाई होळकर पुरस्कार”
1 min read

डॉ विजया नेमाडे आणि नीलिमा महाजन यांना सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठित अहिल्याबाई होळकर पुरस्कार”

Loading

ग्रामपंचायत कळमसरे च्या वतीने अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान.

अमळनेर प्रतिनिधी
ग्रामपंचायत कळमसरे येथील सन 2025 /26 या वर्षाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार गावातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या दोन महिला डॉ विजया सुधाकर नेमाडे तसेच नीलिमा संजय महाजन यांना अहिल्याबाई होळकर जयंती दिनी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच जगदीश निकम,उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चौधरी, तसेच ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह , सन्मानपत्र, शाल, श्रीफळ तसेच रोख पाचशे रुपये या स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शासनाच्या आदेशान्वये दरवर्षी ग्रामपंचायत कळमसरेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दोन महिलांना दरवर्षाप्रमाणे याही वर्षी देण्यात आला. गावातील आरोग्य सेवेत अग्रेसर असणाऱ्या डॉ विजया नेमाडे तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिला सशक्तिकरण करणाऱ्या नीलिमा महाजन यांना यावर्षी सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *