“स्वप्न सत्यात उतरण्याचा अदम्य संघर्ष: तात्यासाहेब विलासराव पाटील यांचा जीवनप्रवास”- नाना माळी पुणे
![]()
स्वप्न सत्यस्पर्श
💐🌹🙏🌹💐
*****************
… नानाभाऊ माळी
काल काय होतो
आज झालो मी काय
स्वप्न पाहिले मनी
येई दुधावर साय..!🌹
ताटी कोण हो देत
कष्ट वाढतचं जाय
उभा डोक्यावर सूर्य
कुणा धरावें पाय..!🌹
स्वप्न चिंगारी झाले
मन वणव्यात जाय
मन मनाला पेटवी
देई आशीर्वाद माय.!🌹
सर्वदूर अंधार असतो!उजेडाचां शोध सुरू असतो!डोळे दूरवर शोधित असतात!काहीही दिसत नाही!अंधार खोदणे सुरूचं राहात!खोदणे कष्टप्रद असतं!अंधुकसा प्रकाश दिसू लागतो!प्रकाशाकडे वाटचाल सुरू असतें!संपूर्ण प्रकाश नजरेस पडतो!घमेंजलेल्या तनाला जाणवत राहात!येशोदीप चमकत राहतो!अंधारावर उजेड बसलेला असतो!… स्वप्न सत्यात उतरलेलं असतं!… खरचं हे स्वप्नवत तर नाही ना!… असं वाटू लागतं!… पण तें वास्तव असतं!हा स्वप्नवत प्रवास सुरूचं राहतो!शिक्षक आदर्श असतो!विध्यार्थी, समाजाचा आरसा असतो!आपण सर्व त्या आरशात बघून जीवन वाटचाल करीत असतो!अशाचं एका जगकल्याण स्वप्न पाहणाऱ्या झपाटलेल्या शिक्षक महोदयाविषयीं…..💐
लहानपणी प्रत्येक व्यक्ती स्वप्न पहात जगत असतो!स्वप्न रंगवत असतो…काहीतरी जगावेगळं करून दाखवावं!चांगलं ते नावीन्यपूर्ण करून दाखवावं!नरदेह एकदाच मिळतो,त्यास सदगुणांची आसं लावून सत्कार्य घडवायचं असतं!मानव समाजात वेगळं,सकारात्मक नाव होईल असं करून दाखवावं!कितीही कष्ट झालेत तरीही स्वप्न साकार करावंचं!पावलोपावली काटे असतीलचं!एक एक काटा वेचावे लागतील!काही अदृश्य काटेही असतील जे डोळ्यांना दिसणार नाहीत!प्रसंगी जीव एकवटून त्यांच्यावरूनही चालावं लागेल!यातना होतील!मन घट्ट करावं लागेल!तळपाय रक्तभंबाळ होतील!खूप वेदना होतील!मनाला,तनाला वेदना होतील!स्वप्नाला जिद्दीची जोड घेऊन ध्येय साध्यासाठी सर्व सहन करावं लागेल!असं ते स्वप्नाळू जग असतं!
जगावेगळी स्वप्न पाहणारी खूप माणसं असतात!प्रालोभनं समोर असतांना त्याग करून कार्य सिद्धीस नेत असतात!काहींची स्वप्न कधी कधी अपूर्ण राहतात तेव्हा स्वप्नातील काटे बोचू लागतात!प्रयत्न करूनही तेथवर पोहचता येत नसल्याने या व्यक्ती स्वतःस छळत बसतात!पाहिलेलं स्वप्न साकार होऊ शकलं नाही म्हणून आतून तुटून जातात!वाकून जातात!स्वतःला,इतरांना दोष देत बसतात!माघार,अपयश अन अपूर्ण प्रयत्नांमुळे थांबून जातात!आपलं राहाट जगणं सुरूचं ठेवतात!
तर…तर.. काहीजन मनावर, तळपायांवर पक्के घट्टे करून घेत असतात!काटे मोडून पडतात!तरीही त्यांचं चालणं थांबलेलं नसतं!हे अवघड वाटेचे वाटसरू वाटचाल करीत रहातात!यांना माघारीं फिरणं कठीण जात असत!मध्येचं थांबणे नसंत!प्रलोभन,आमिष,मोहाला झूगारून स्वप्नांना सर्वस्व अर्पण करून बसतात!उराशी बाळगलेलं स्वप्न साकारासाठी स्वतःस झिजवतं असतात!असे झिजणारें महानुभव समाजाच्या डोळ्यातून महान होत असतात!ध्येय हेचं त्यांचं जीवन बनून जातं असतं!असे समाजप्रिय, गुरुतुल्य व्यक्तिमत्व सामाजिक उद्धारासाठी जमिनीत घट्ट पाय रोवून उभे राहातात!अनेक अडथळे पार करीत सात्विक सत्यासाठी लढा उभारतात!हा लढा सामाजिक उत्थापनाचा असतो!लढा विशाल होत जातो!त्यातून समाजोन्नत्ती होत रहाते!हा लढा सामाजिक बदलाचा असतो!लढा इतिहास उभा करीत असतो!लढ्यातून केवळ जिंकणे नसतं!सत्यांश त्यात असतो!
असेच एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व वेगळ्या वाटेवर चालत आहेत!तात्विक लढा उभारून इतरांचे प्रेरणास्रोत बनलेले आहेत!समतेच्या वाटेवर चालत आहेत!बंधुतेशी नातं जोडून परिवर्तनाच्या मार्गावर चालत आहेत!समाजिक समस्यांचा पाठपुरावा करणाऱ्या या प्रबोधनकार, विचारवंतासं नमन करतो!अशा या आदरणीय *तात्यासाहेब विलासराव पाटील सरांना* वंदन करतो!
अनेक सामाजिक संघटनेत कार्यरत श्री तात्यासाहेबांनी संघटनेच्या हितासाठी स्वतःसं झोकून दिलेलं आहें!झोकून देण्यातून झपाटलेंपण मनात,अंगात भिनतं असतं!ते भिनलेंपण आयुष्य फुलवत राहात!हे भिनलेंपण चळवळ उभी करतं असतं!हे वेगळे जगणं आंतरिक सुख देत असतं!विचार जुळले की मानसे जवळ येत असतात!मैत्रीचे, मित्रात्वाचे संबंध प्रस्थापित होतात!पाण्यासारखे स्वच्छ खळखळून वाहणारे असतात!प्रतिभावानं व्यक्ती कोळशाच्या खाणीतून सोनें काढीत असतात!नवनिर्मितीचां आनंद असतो!एक एक पायरी वर चढत एखादया संघटनेच्यां अध्यक्षपदापर्यंत मजल मारली जाते, ही गोष्ठ साधी नाही!एका आदर्श शिक्षकाचे हे सुपुत्र!वडील कमी बोलायचे!शांत, संयमी होते!एका आदर्श मातेचां सुपुत्र!आई काँग्रेस सेवादलाची कार्यकर्ती!आईचं माहेर धुळ्याचं!आई वडिलांचा आदर्श तात्यासाहेबांच्या अंगी उतरला असावा!आपल्या जीवनाचं उद्दिष्ट बालपणीचं पक्के करणारा!लग्न करून फक्त एका अपत्यावर थांबणारा!ते ही एका मुलीवर थांबणारा!अशा माणसाला कसला स्वार्थ शिवणार बरं ? जो व्यक्ती फक्त देणं जाणतो त्याला कुठला स्वार्थ असणार?पूजनीय साने गूरुजींचीं कर्मभूमी अमळनेर!अमळनेर जवळ *देवगाव देवळी* हे तात्यासाहेब विलासराव पाटील सरांचं जन्मगाव!वंदनीय सानेगुरुजींचां तेजोमय आदर्श हृदयात होता!बालपण धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथे गेलेलं!पुढे स्वतः नोकरीला धुळे नगरपालिका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत राहिले!जन्मभूमीत देवगावं देवळीला माध्यमिक शाळा सुरू करून शासन मान्यता आणून नावारूपास आणली!अनेक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहून आपलं जीवन केवळ निःस्वार्थ सेवेस वाहिलेलं!अशा या विध्यार्थी आणि समाज घडविणाऱ्या आदर्श समाज सेवकाचीं ११ मे २०२५ रोजी एकसष्टी होती!तें साठ वर्षांचे झाले असं वाटत नाही!हे सकारात्मक विचार धारेच प्रतिक आहें!ही विचारधारा माणसाला ईश्वराकडे नेत असतं!अशा व्यक्तित्वाचा सन्मान शब्द सुमनांनी होत होता!सरांचं वक्तृत्व अतिशय प्रभावी असतं!अन शब्दांचे पूजारी असणारे देखील आहेत!


धुळे येथील हिरे भवनातं आदरणीय तात्यासाहेब विलासराव पाटील सरांच्यां एकसष्ठीनिमित्त समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं!त्यात एक व्हिडीओही दाखविण्यात आला होता!त्यातून सरांचां जीवन प्रवास उलगडण्यात आला होता!’जन्म कशासाठी असतो बरं?’ त्याचा सार कळत होता!व्हिडीओतून कार्य कर्तृत्व गुणांचां आढावा घेण्यात आला होता!समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवरांचीं हजेरी होती!सामाजिक, राजकीय अन अनेक स्नेहीजन आले होते!सरांवर प्रेम करणाऱ्या अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते!राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते!धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ. शोभाताई बच्छाव ताईसाहेब, माजी आमदार श्री. कुणाल पाटील साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. बापूसाहेब खलाणे आदी मान्यवर उपस्थित होते!संघटनेचे अनेक पदाधिकारी अन मान्यवर आवर्जून उपस्थित होते!
आपल्या कार्यकर्तृत्वातून अव्याहतपणे सामाजिक बांदिलकी जपणाऱ्या विलासराव पाटील सरांचीं एकसष्टी संस्मरणीय अशी होती!निःस्वार्थ सेवेची परिपूर्ती होती!स्वकृतीतून आदर्श निर्माण करणारी होती!समृद्ध अनुभवांचं भांडार घेऊन हिंडणारं हे निर्गवी व्यक्तिमत्व म्हणजे संवाद शिदोरी आहेत!संवादाने माणसं जमवून माणुसकीचा सकारात्मक पूल बांधणाऱ्या व्यक्तित्वाचा सुयोग्य सन्मान होणे हे गौरवास्पद होत!अशा मूठभर व्यक्तीचं सामाजिक लढाया लढून माणसा माणसात माणुसकीचं उत्तम बीज पेहरीत आहेत!समाज जागृती आणि डोळस करीत आहेत!मानव सामाजाला शक्ती देत आहेत!वंदनीय विलासराव पाटील सरांना एकसष्टी निमित्त हृदयातल्या अनेक हार्दिक शुभेच्छा!
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
****************************
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२७ मे २०२५
nanabhaumali.blogspot.com

