अमळनेरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन**
1 min read

अमळनेरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन**

Loading

**अमळनेरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन**

अमळनेर प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. केंद्र शासनाने त्यांच्या सन्मानार्थ ३०० रुपयांचे नाणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, राज्य सरकारने त्यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अभिवादन केले आहे तसेच अनेक कार्यक्रम राबवत आहे. जळगाव जिल्हास्तरावर तीनशे किलोमीटर लांब चार चाकी वाहनांची रॅली काढण्याचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

**अमळनेर तालुका सकल धनगर समाजाचा रक्तदान शिबिर**

अमळनेर तालुका सकल धनगर समाजाने पुण्यश्लोक अहिल्यामाईंच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपल्या छोट्या योगदानातून एखादा अमूल्य जीव वाचवण्याचा संदेश देत, सर्वांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदानासाठी इच्छुकांनी ९४२३९३४५७७ अथवा ९७३०८३६८३० या क्रमांकावर नावाची नोंदणी करावी, ज्यामुळे रक्तदात्यांची योग्य काळजी घेतली जाईल.
अमळनेर तालुका सकल धनगर समाजाकडून हा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *