संत शिरोमणी श्री भीमा भोई महाराज यांची जयंती भोई वाडा, अमळनेर येथे मोठ्या आनंदाने साजरी
![]()
*संत शिरोमणी श्री भीमा भोई महाराज यांची जयंती भोई वाडा, अमळनेर येथे मोठ्या आनंदाने साजरी
अमळनेर प्रतिनिधी
चाहे मुझे नरक मिले | लेकिन जगत का कल्याण हो
असे महान विचार असणारे आदर्श संत शिरोमणी श्री भीमा भोई महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखंड भोई समाजाच्या कार्यकर्त्यांनी श्री भीमा भोई महाराज यांचा प्रतिमा समोर नतमस्तक होऊन त्रिवार वंदन करून पूजन करण्यात आले महान ज्ञानी, महान कवी, महान प्रज्ञावंत, महानत्यागी, महान धर्मगुरू अशा अनेक उपाधी लावून घोषणा देण्यात आल्या
श्री भीमा भोई महाराज यांचे आदर्श विचार प्रत्येकाने अंगीकारावे असे आदर्श विचार जर डोक्यात रुजले तर आदर्श व्यक्तिमत्व घडतं हे विचार मांडण्यात आले
या कार्यक्रमाप्रसंगी भोई समाजाचे महिला मंडळ, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, वयस्कर नागरिक असे सर्वजण उपस्थित होते
कार्यक्रम आनंदाने आदर्श पद्धतीने साजरा करण्यात आला 🙏🏻

