“स्पर्धा परीक्षांसाठी सातत्य व मेहनत आवश्यक – विधान भवनातील बाळासाहेब पाटील यांचा शिरुड येथील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश”
1 min read

“स्पर्धा परीक्षांसाठी सातत्य व मेहनत आवश्यक – विधान भवनातील बाळासाहेब पाटील यांचा शिरुड येथील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश”

Loading

“स्पर्धा परीक्षांसाठी सातत्य व मेहनत आवश्यक – विधान भवनातील बाळासाहेब पाटील यांचा शिरुड येथील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश”

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील शिरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिकेला विधान भवन मुंबई चे कमांडिंग ऑफिसर बाळासाहेब पाटील यांच्या समवेत संजय साटोटे, अविनाश संदानशिव यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी कमांडिंग ऑफिसर बाळासाहेब पाटील व इतरांचा सत्कार अतुल सोनवणे, डी ए धनगर यांनी केला. बाळासाहेब पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी तुम्हाला सातत्य, सचोटी, मेहनत व योग्य मार्गदर्शन घेऊन स्पर्धा परीक्षा यशस्वी होता येऊ शकते. आगामी काळात तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर ती भागवायला मी सदैव तत्पर असेल. विधान भवनात अद्यावत ग्रंथालय आहे. त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना बघण्याचे निमंत्रण दिले. तसेच तुम्हाला कोणत्या पुस्तकांची कमतरता असेल तर ती पुस्तके मी लगेच पाठवतो असे आश्वासन दिले. कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याची गाडी, बंगला मानमतराब आपल्याला दिसतो परंतु त्यासाठी त्यांनी केलेले समर्पण जाणून घेतले तर तुम्हालाही यश मिळू शकते असे सांगितले. कोणत्याही गोष्टीचे पूर्ण सत्य जाणून घेतले तर आपली फसवणूक होत नाही हे ठासून सांगितले.
ग्रामीण भागामध्ये एवढी अद्यावत अभ्यासिका निर्माण केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तुमच्यातला उत्साह, स्वयंस्फूर्ती, स्वयंशिस्त उत्तम असल्याचेही सांगितले. ग्रामीण भागातील अनेक अधिकारी घडले पाहिजे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. यावेळी डी.ए्. धनगर, अतुल सोनवणे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी कल्पेश पाटील, जगदीश शिंपी, मयूर पाटील, दिग्विजय कोळी, निखिल पाटील व अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *