“23 वर्षांनंतरच्या आठवणी साजऱ्या करत साधना माध्यमिक विद्यालयाचे अभिमानास्पद स्नेहसंमेलन”
1 min read

“23 वर्षांनंतरच्या आठवणी साजऱ्या करत साधना माध्यमिक विद्यालयाचे अभिमानास्पद स्नेहसंमेलन”

Loading

“23 वर्षांनंतरच्या आठवणी साजऱ्या करत साधना माध्यमिक विद्यालयाचे अभिमानास्पद स्नेहसंमेलन”

 

जळगांव प्रतिनिधी

दिनांक 18 मे 2025 रोजी इयत्ता दहावी (क) बॅच 2001/02 च्या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम साधना माध्यमिक विद्यालय शाखा वसंत साखर कारखाना यांच्या वतीने साधना माध्यमिक विद्यालय कासोदा येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य दैवत सरस्वती मातेच्या पूजनाने कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासो.श्री. सी.जी. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी श्री सी.जी. पाटील सर, शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री बेडसे सर,तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री.पांडुरंग पाटील सर,श्री. एस. एम. पाटील सर, श्री व्ही. एन. पाटील सर श्री पी.डी. रवंदळे सर श्री एन.एन. पाटील सर श्री अमृत पाटील हे उपस्थित होते. सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारींचे शाल, टोपी, भेटवस्तू व बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम अत्यंत आनंदाच्या वातावरणात पार पडला यावेळी सर्व शिक्षक वृंद यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी आपला संक्षिप्त परिचय दिला तसेच मनोगतही व्यक्त केले सदर कार्यक्रमात नंतर शाळेसाठी ब्लुटूथ साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. या कार्यक्रमासाठी जवळपास 45 विद्यार्थी,विद्यार्थीनींनी हजेरी लावली. सर्वांना 23 वर्षानंतर पुन्हा
भेटल्याचा मनस्वी आनंद झाला . यावेळी माजी विद्यार्थिनी ज्योती पाटील यांना शहीद दत्तात्रय पाटील यांच्या वीरपत्नी म्हणून साडी देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राथ. शिक्षक श्री. राजशेखर सोनवणे सर व ज्येष्ठ बंधू श्री शेखर पाटील दादा यांनी केले.कार्यक्रमामुळे सर्वांना बालपणीच्या आठवणी जागी झाल्यात पुन्हा भविष्यात असाच कार्यक्रम घेण्याचे सर्वानुमते ठरले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. भुषण पाटील,श्री. चंद्रकांत चव्हाण, श्री. सुशील पाटील श्री. लक्ष्मीकांत नेरपगार श्री.सतीश सोनवणे श्री.विशाल पाटील श्री अमोल पवार श्री मिथुन देशमुख व सर्व मित्र परिवार यांनी मेहनत घेतली तसेच शिक्षेतर कर्मचारी यांनी ही खुप मेहनत घेतली. अशारीतीने शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *