मारवड पोलिस ठाण्यात होमगार्डची हजेरीची छेडछाड; मानधन वळवण्याचा घोटाळा उघडकीस
1 min read

मारवड पोलिस ठाण्यात होमगार्डची हजेरीची छेडछाड; मानधन वळवण्याचा घोटाळा उघडकीस

Loading

मारवड पोलिस ठाण्यात होमगार्डची हजेरीची छेडछाड; मानधन वळवण्याचा घोटाळा उघडकीस

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यात एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. येथे परीक्षा बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या एका होमगार्डचे ड्युटीवर हजेरी दाखवण्यात आला असतानाही त्याला मानधन मिळाले नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती अधिकारात मिळालेल्या दस्तऐवजांवरून हे स्पष्ट झाले आहे की संबंधित होमगार्ड पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष ड्युटीवर हजर होता, मात्र त्याचे नाव मानधन यादीत गैरहजर दाखवण्यात आले आहे.
याप्रकरणी संशय असा आहे की, पोलिस ठाण्याच्या हजेरी मास्टरचा लॉगिन आयडी वापरून कोणीतरी हेतुपुरस्सर छेडछाड केली असावी. यामुळे त्या होमगार्डच्या मानधनावर गदा आली आहे. विशेष म्हणजे, हजेरी मास्टर व प्रभारी पोलिस अधिकारी यांना याची कल्पना न देता हा प्रकार घडवण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सदर प्रकरणाची चौकशी सध्या मारवड पोलिस ठाण्यात प्रलंबित असून संत गतीने कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे, दोषीवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मारवड पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारे अधिकारी लॉगिन आयडीचा गैरवापर होत असेल, तर हे संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *