रेल्वे अपघाताचे कळताच आमदार अनिल पाटलांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना
1 min read

रेल्वे अपघाताचे कळताच आमदार अनिल पाटलांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना

Loading

रेल्वे अपघाताचे कळताच आमदार अनिल पाटलांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना

अमळनेर रेल्वे स्थानकावर मालगाडीचा अपघात झाला असल्याची माहिती सध्या मुंबईत असलेले माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांना कळताच त्यांनी रेल्वेचे स्थानिक व भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मदतकार्य करण्याच्या सुचना केल्या,तसेच आपल्या काही कार्यकर्त्याना तात्काळ घटनास्थळी पाठवून संपूर्ण अपडेट जाणून घेतले.याठिकाणी कामगारांना कोणत्याही बाबीची गरज भासल्यास संपूर्ण मदतीची तयारी दाखविली.या अपघातामुळे इतर प्रवासी गाड्या जागीच थांबून प्रवाश्यांचे हाल होत असल्याने तातडीने वाहतूक सुरळीत करण्याचीही विनंती आमदारांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली.तसेच याकामी युद्धपातळीवर काम करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचे आमदार पाटील यांनी कौतुक करत जनतेच्या वतीने आभार देखील व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *