महात्मा फुले हायस्कूल शाळेत सावित्रीमाईंच्या लेकींची उंच भरारी !….  शाळेतुन प्रथम नंदिनी भोई , द्वितीय चेतना जावरे व तृतीय तेजस्विनी माळी
1 min read

महात्मा फुले हायस्कूल शाळेत सावित्रीमाईंच्या लेकींची उंच भरारी !…. शाळेतुन प्रथम नंदिनी भोई , द्वितीय चेतना जावरे व तृतीय तेजस्विनी माळी

Loading

महात्मा फुले हायस्कूल शाळेत सावित्रीमाईंच्या लेकींची उंच भरारी !….

शाळेतुन प्रथम नंदिनी भोई , द्वितीय चेतना जावरे व तृतीय तेजस्विनी माळी

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दि. १३ मे, २०२५ ला दहावीचा ऑनलाईन निकाल घोषित झाला. परीक्षेला ३१ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एक विद्यार्थी अनुपस्थित होता.शाळेचा निकाल ९७ % लागला असुन सावित्री माईंच्या लेकींनी उंच भरारी घेतली आहे.शाळेतून प्रथम नंदिनी तुळशीराम भोई – ९० %, द्वितीय चेतना संजय जावरे – ८७.६० %,
तृतीय तेजस्विनी हरी माळी – ८७.२० %,
चतुर्थ ललीता रोहीदास झेंडे – ८६.६० %,
पाचवा जयपाल गोकुळ राजपूत – ८४.०० %, सहावा वादिश आनंदा शिरसाट – ८२.८०, %, सातवा रिषभ राजेश बोरसे – ८०.४० %, आठवी कोमल कैलास भोई – ७८.२० %, नववा शिवम दीपक सरदार – ७६.४० % दहावा दुर्गेश अण्णा महाजन – ७५.८० % सर्व एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, वर्गशिक्षक पी डी पाटील, एस व्ही आढावे तसेच सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी मनस्वी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *