गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविकांना दोन गणवेशासाठी बाराशे रुपये मिळणार* *संघटनेच्या पाठपुराव्याला यश- रामकृष्ण बी.पाटील*
![]()
*आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना*
*गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविकांना दोन गणवेशासाठी बाराशे रुपये मिळणार*
*संघटनेच्या पाठपुराव्याला यश- रामकृष्ण बी.पाटील*
राज्यातील नागरी आणि ग्रामिण विभागातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दरवर्षी दोन गणवेशाच्या साड्यांसाठी बाराशे दिले जात होते. परंतु चालू आर्थिक वर्षात शासनाने नागरी विभागातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना दोन गणवेश साडयासाठी बाराशे रुपये आणि ग्रामिण विभागातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना एक गणवेशच्या साडीसाठी सहाशे रुपये अशी तरतूद केली होती. त्यामुळे ग्रामिण विभागातील आशांताईवर अन्याय झाला होता. शासनाकडून नागरी आणि ग्रामिण असा भेदभाव झाल्याने आशाताईंमध्ये नाराजी पसरली होती.
गणवेशाच्या साड्यांची रक्कम देण्यात कोणताही भेदभाव न करता पूर्वीप्रमाणेच सामान दिली पाहिजे यासाठी संघटनेने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरु केला होता. परिणामी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक डॉ. गोविंद पंडित चौधरी यांनी दि.08.05.2025 रोजी परिपत्रक काढून नागरी विभागातील आशाताईंप्रमाणे ग्रामीण विभागातील आशाताई व गटप्रवर्तकांना पूर्वीप्रमाणे दोन गणवेशाच्या साड्यांसाठी बाराशे रुपये अदा करावेत असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आदेशित केले आहे.
त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे तीन हजार आशा स्वयंसेविकांसह राज्यातील सुमारे 67 हजार पाचशे गटप्रवर्तक आणि आशाताईंना त्याचा लाभ होणार आहे.संघटनेने केलेल्या प्रयत्नामुळे शासनाला आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची मागणी मान्य करावी लागली आहे.
तसेच यापुढेही प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी एकत्र यावे असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकांन्वये केले आहे.

