राज्यातील उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा श्री मंगळ ग्रह सेवा संस्थानच्या वतीने गौरव
![]()
राज्यातील उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा श्री मंगळ ग्रह सेवा संस्थानच्या वतीने गौरव
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राज्यातील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांच्या श्रेयानुसार अग्रेसर ठरलेले जिल्हाधिकारी मा. श्री. आयुषजी प्रसाद साहेब (I.A.S.) व जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी साहेब (I.P.S.) यांचा आज मंगळ ग्रह सेवा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष व व्हाईस आँफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस व जेष्ठ पत्रकार
डॉ. डिगंबर महाले यांनी अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते
या सत्काराने स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा उन्नतीचा मार्ग अधिक प्रेरणादायक करण्याचा संदेश दिला असून, येत्या काळातही त्यांच्या कार्यातील गुणवत्ता आणि समर्पण सातत्याने वाढत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

