प्रेरणा फाउंडेशनने अनाथ आश्रमामध्ये कार्यक्रम आयोजित करून एक नव्या समाजकार्याची आपणास प्रेरणा दिली-सुनील इंगळे ज्येष्ठ पत्रकार व अध्यक्ष बहिणाई ट्रस्ट
1 min read

प्रेरणा फाउंडेशनने अनाथ आश्रमामध्ये कार्यक्रम आयोजित करून एक नव्या समाजकार्याची आपणास प्रेरणा दिली-सुनील इंगळे ज्येष्ठ पत्रकार व अध्यक्ष बहिणाई ट्रस्ट

Loading

प्रेरणा फाउंडेशनने अनाथ आश्रमामध्ये कार्यक्रम आयोजित करून एक नव्या समाजकार्याची आपणास प्रेरणा दिली: सुनील इंगळे ज्येष्ठ पत्रकार व अध्यक्ष बहिणाई ट्रस्ट
********************
बदलापूर वृत्त : प्रेरणा फाउंडेशन चा सातवा वर्धापन दिन सोहळा सत्कर्म आश्रम,सोनीवली,बदलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी मॅडम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री.सुनील इंगळे यांना समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रगौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला यावेळी तेथील आश्रमामधील अनाथ मुलांची आरोग्य तपासणी त्यासोबत अन्नदान सोहळा व राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्त्यांचा आदर्श सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रामजीत गुप्ता(अँटी पायरसी तपासी अधिकारी- मुंबई) श्री.अविनाश म्हात्रे (अध्यक्ष:कुष्ठरोग दीनदयाळ संस्था), श्री.गुरुनाथ तिरुपणकर (ज्येष्ठ पत्रकार व जनजागृती सेवा संस्थाचे संस्थापक अध्यक्ष) यासोबत विविध मान्यवर उपस्थित होते.
असे सामाजिक कार्यक्रम एखाद्या अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेत की जे विनाअनुदानित आहेत अशा ठिकाणी संपन्न झाले तर ते अधिक प्रभावी ठरून, जेणेकरून त्या अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेला मानसिक, आर्थिक पाठबळ मिळते असे कार्यक्रम अशा विविध संस्थांमध्ये आयोजित करावे असे आवाहन याप्रसंगी बहिणाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील इंगळे यांनी व्यक्त करून आदरणीय प्रेरणा मॅडमचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *