पत्रकार आणि समाजसेवींनी अनाचाराविरूध्द एकत्र आलं पाहिजे…..संजय एम.देशमुख* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई विचारमंथन मेळावा संपन्न.सांताक्रूजमधील बिल्डरबाबत तक्रारदार २० नागरीकांची तक्रारीसह उपस्थिती.* *महापुरूषांना अभिवादन,अतिथी ,पदाधिकारी सन्मान,सामुहिक श्रध्दांजली..!*
![]()
*पत्रकार आणि समाजसेवींनी अनाचाराविरूध्द एकत्र आलं पाहिजे…..संजय एम.देशमुख*
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई विचारमंथन मेळावा संपन्न.सांताक्रूजमधील बिल्डरबाबत तक्रारदार २० नागरीकांची तक्रारीसह उपस्थिती.*
*महापुरूषांना अभिवादन,अतिथी ,पदाधिकारी सन्मान,सामुहिक श्रध्दांजली..!*
*अकोला* -शासन- प्रशासनातील अनैतिक प्रवृत्तींकडून संविधान आणि लोकशाहीचे प्रचंड अवमुल्यन होत असून निरपराधांना कायद्यांचे संरक्षण आणि न्याय मिळणे दुरापास्त झालेले आहे. सज्जन, सदाचाऱ्यांना मनस्तापाची सजा आणि अपराधी गुडांना कायद्यांच्या दुरूपयोगाने ऐशोरामी मजेचे उपहार दिले जात आहेत.समाजावरील अन्याय,हाल अपेष्टा,आणि लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांविरूध्द संघर्ष करण्यासाठी पत्रकारांनी संघटीत झालं पाहिजे आणि समाजानेही त्यांना साथ दिली पाहिजे.असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई- कोकण विभागाचा ६ वा मासिक विचारमंथन मेळावा शेठ नथुराम चिमणराव स्कूल,सांताक्रूझ, मुंबई येथे संपन्न झाल.त्यावेळी अध्यक्षिय मनोगतातून ते बोलत होते.
यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.शहिद जवान,अत्त्याग्रस्त महिला बळी,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,आपत्ती व अपघात बळीआत्महत्याग्रस्त शेतकरी व दिवंगत पत्रकारांना सामुहिक श्रध्दा़ंजली वाहण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विधी व न्याय विभागाचे मंत्रालयीन सहसचिव संजाबजी देशमुख, लोकस्वातंत्र्यचे राष्ट्रीय पदाधिकारी पुष्पराज यांची विचार मंचावर उपस्थिती होती.संजाब देशमुख यांचा सन्मान स्मृतीचिन्ह शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्री पुष्पराज गावंडे व मंत्रालयीन समन्वयक व मुंबई प्रदेश संघटक रफिक मुलानी यांनी मनोगते व्यक्त केली. संघटनेसाठी प्रभावी कार्य करणारे विनोद चाळके आणि राजीव विश्वकर्मा यांचा सन्मानस्मृती चिन्हाने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र संघटन- संपर्क प्रमुख अरविंदराव देशमुख,अंधेरी संघटन प्रमुखराजीव विश्वकर्मा,कार्यक्रमाचे संयोजक विनोद चाळके,कमलेश कुबल,पालघर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख देवेन्द्र मेश्राम,(बोईसर)विकास भोसले(चेंबूर)अनेक पत्रकार व विकास बांधकामाविषयी बिल्डरबाबत तक्रार घेऊन येणारे सांताक्रूजमधील २० रहिवाशी नागरीक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन व आभाप्रदर्शन मुंबई प्रदेश पत्रकार महिला आघाडी प्रमुख सौ.सुषमा ठाकूर-ढोले यांनी केले.

