धरणगावमध्ये बालविवाह प्रतिबंधक कारवाई; १६ वर्षीय मुलीचा विवाह रद्द
![]()
धरणगावमध्ये बालविवाह प्रतिबंधक कारवाई; १६ वर्षीय मुलीचा विवाह रद्द
अमळनेर प्रतिनिधी
धरणगाव, ४ मे २०२५: धरणगाव शहरातील चोपडा येथील १६ वर्षीय मुलगी आणि धरणगाव येथील २२ वर्षीय मुलाचा विवाह दिनांक ५ मे २०२५ रोजी धरणगाव येथे होणार होता. मात्र, हळदीचा कार्यक्रम ४ मे २०२५ सायंकाळी निश्चित असताना, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर आणि मा. श्री नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मुलगी अल्पवयीन असल्याने आवश्यक कारवाई करण्यात आली.
श्री लक्ष्मण सातपुते (नायब तहसीलदार), श्री राहुल ढेरंगे (ग्राम महसूल अधिकारी), पोलिस उपनिरीक्षक श्री संतोष पवार, पोलिस कॉन्स्टेबल श्री सुमित बाविस्कर, आणि पोलिस नाईक श्री उमेश पाटील यांच्या उपस्थितीत मुलीच्या आई-वडिलांना व इतर नातलगांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन समुपदेशन केले गेले. अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना लेखी समजही देण्यात आली.
त्यामुळे ५ मे २०२५ रोजी होणारा बालविवाह थांबविण्यात आला आहे. ही कारवाई मा. उपविभागीय अधिकारी श्री मनीष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्री महेंद्र सूर्यवंशी आणि पोलिस निरीक्षक श्री पवन देसले यांच्या सहकार्याने करण्यात आली.

