पंढरपूर-अमळनेर संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवात रथ मिरवणुकीत सुरक्षेसाठी ट्रॅक्टरचा समावेश! ३०० वर्षांच्या परंपरेत सन्मान राखत भाविकांसाठी आनंददायी आणि सुरक्षित यात्रा!
![]()
पंढरपूर-अमळनेर संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवात रथ मिरवणुकीत सुरक्षेसाठी ट्रॅक्टरचा समावेश!
३०० वर्षांच्या परंपरेत सन्मान राखत भाविकांसाठी आनंददायी आणि सुरक्षित यात्रा!
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
पंढरपूर-अमळनेर येथील संत सखाराम महाराजांच्या पावणे तीनशे वर्षांच्या ऐतिहासिक यात्रोत्सवात यंदा भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मांना एकत्र घेणारा आणि प्रत्येक घटकाला सन्मान देणारा हा उत्सव यापुढे अधिक सुरक्षित आणि सुलभ बनवण्याच्या दृष्टीने रथ मिरवणुकीमध्ये रथाला सुरुवातीला दोराने ओढण्याची परंपरा कायम ठेवून नंतर ट्रॅक्टरद्वारे रथ ओढण्याचा निर्णय घेतला आहे.
हा बदल महिलांपासून ते वृद्ध, लहान मुले, दिव्यांग सर्व भाविकांना सहज दर्शन घेता यावे, प्रदक्षिणा घालता यावी यासाठी करण्यात आला आहे. आतापर्यंत ओढताना होणाऱ्या गर्दीमुळे अनेकदा दर्शन घेणे विस्कळीत व्हायचे तसेच महिलांना असुरक्षित वाटायचे ही समस्या कमी करण्यात येणार आहे. तसेच खिसे कापण्यासारख्या गैरव्यवहारांवरही यामुळे आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
यात्रोत्सवाच्या मान-सन्मानात कोणताही घट बसलेला नाही, सर्व समाजाला त्यांचा हिस्सादारत्व पूर्ववत राहील. संस्थानकडून सर्व भक्तांचे सहकार्य आणि सुखशांतीने यात्रोत्सव साजरा करण्याची आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात ऐक्याचे अप्रतिम प्रतीक असलेल्या या उत्सवातून भक्ती आणि एकात्मतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पसरविण्यात येणार आहे.

