संतोषगीर गोस्वामी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव…
![]()
संतोषगीर गोस्वामी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव…*
*जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित* आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण विभाग अमळगाव ता.अमळनेर जि. जळगाव शा.र.देशपांडे भाग शाळा जळोद ता. अमळनेर येथील *कनिष्ठ लिपिक श्री. संतोषगीर शामगीर गोस्वामी* हे दि.30 एप्रिल 2025 रोजी (अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी आयुष्याची दुस-या इनिंगची सुरूवात करून) नियत वयोमानानुसार 29 वर्षे व 6 महिने इतकी प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ कालच *’1मे महाराष्ट्र दिनी’* आदर्श विद्यालय अमळगाव येथे पार पडला. विशेष म्हणजे आजचे विद्यालयातील ध्वजारोहण हे श्री.गोस्वामी भाऊसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे *अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासो. श्री.आर.यु.पाटीलसर* यांनी भुषविले. विचारमंचावर जेष्ठ प्राध्यापक एस. बी. पाटीलसर , निरोपार्थी गोस्वामी भाऊसाहेब,त्यांच्या धर्मपत्नी व भाऊसाहेबांचे जावई बापूसाहेब अक्षयपुरी गोसावी व कन्या सौ.सायली गोसावी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाऊसाहेब यांचे जावई व कन्या जे विशेष करून हैदराबाद येथून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते त्यांचा विद्यालयाच्यावतीने यथोचित सत्कार करून स्वागत करण्यात आले .
यानंतर *श्री.एस.एस.गोस्वामी भाऊसाहेब यांना विद्यालयातर्फे स्मृतिचिन्ह, कपडे,साडी, शाल,नारळ व बुके देऊन सपत्नीक गौरविण्यात आले.* यावेळी उपस्थित नातेवाईकांनी, तसेच सर्व सहका-यांनी/मित्रपरिवाराने त्यांचा सेवापूर्तीबद्दल सत्कार केला. काल भाऊसाहेब व त्यांच्या चिमुकल्या नातीचा वाढदिवस असल्याने उभयतांना उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नातेवाईकांमधून भाऊसाहेबांचे जावई श्री.अक्षयपुरी गोसावी यांनी याप्रसंगी आपल्या मनोगतात…. संस्थेने सासरे बुवांचा केलेला सत्कार पाहून मी भारावून गेलो आहे. आपली संस्था ख-या अर्थाने तळागाळातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून सुजाण व जबाबदार नागरिक घडविण्याचे अत्यंत सुंदर काम करीत आहे , हे पाहून मी गुरूजनांचे आभार मानतो… तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो…असे विचार मांडले, विद्यालयाच्यावतीने व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रा.शाम पाटीलसर , कनिष्ठ लिपिक श्री.पी.एच.सोनवणे यांनी भाऊसाहेबांविषयी मनोगत व्यक्त केले.
शेवटी अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक श्री.आर.यु.पाटीलसर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. ए.जी.बैसानेसर यांनी तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. संजीव पाटीलसर यांनी केले .फलक लेखन व सजावट कलाशिक्षक श्री.एन.एल.सोनवणेसर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श विद्यालय अमळगाव येथील सर्व कर्मचारी बंधू-भगिनी यांनी विशेष सहकार्य केलं .

