बायकोच्या आग्रहास्तव विधवा आईला घर सोडायला सांगितले! महिला अन्याय विरोधी समितीने तिघांना आणले एकत्र! कायद्याचा धाक व भावनिक साद घातल्याने घडला समेट.
![]()
बायकोच्या आग्रहास्तव विधवा आईला घर सोडायला सांगितले!
महिला अन्याय विरोधी समितीने तिघांना आणले एकत्र!
कायद्याचा धाक व भावनिक साद घातल्याने घडला समेट.
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील ६० वर्षीय विधवा जिजाबाई (नाव बदलले आहे) यांना त्यांच्या मुलाच्या बायकोकडून तगादा देऊन घराबाहेर जाण्याचा इशारा दिला गेला आणि त्यामुळे अनिता वर्षभरापासून माहेरी राहात होती. मुलाने आईलाच घरातून कुठेही निघून जायचे सांगितले होते. या अन्यायामुळे विधवा जिजाबाईने महिला अन्याय विरोधी समितीकडे आपली आपल्या दुर्दैवाची व्यथा मांडली.
समितीचे प्रमुख धनंजय सोनार यांनी सहकाऱ्यांसह अनिता व अनिल यांची भेट घेऊन भावनिक समुपदेशन केले. “उद्या तुम्ही पण म्हातारे होणार; असा असहाय वृद्ध महिला कुठे जाईल? घराबाहेर काढणे हे कायद्यानुसार गुन्हा असून त्यासाठी कडक शिक्षा आहे,” असा आवाहन त्यांनी दिला.
चार महिन्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आणि अनेक बैठकींनंतर अनिता व अनिल यांचे मतपरिवर्तन झाले. अक्षय तृतीयेच्या शुभदिनी अनिता अमळनेरात परतली. जिजाबाईला कोणताही त्रास होणार नाही याची पंचासमक्ष हमी घेऊन त्या अक्षय मुहूर्तावर तिघे एकत्र आले.
या प्रकरणात धनंजय सोनार, गौतम मोरे, मंगला विसपुते, संचीता बिऱ्हाड़े, निवृत्त फौजदार बाळकृष्ण शिंदे, राजकुमार कोराणी, अनिल चौधरी आदींनी विशेष मेहनत घेतली. शिरपूर व अमळनेर येथील दोन्ही कुटुंबानी महिला अन्याय विरोधी समितीचे मनापासून आभार मानले आहेत.
हे प्रकरण वृद्धांचे सन्मान आणि कुटुंब एकत्रतेचे उदाहरण ठरले असून, समाजात अशीच संवेदनशीलता वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

