“शिक्षणातून समाजसेवेपर्यंतचा प्रवास; सागर कोळी यांचा जळगाव युवा पुरस्काराने सन्मानित”**
![]()
**“शिक्षणातून समाजसेवेपर्यंतचा प्रवास; सागर कोळी यांचा जळगाव युवा पुरस्काराने सन्मानित”**
अमळनेर प्रतिनिधी
-: 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने युवकांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो. तरी 2024-25 या वर्षी 1 मे महाराष्ट्र दिना निमित्त पुरस्कार राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर सुकदेव कोळी यांना जळगाव जिल्हाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय,जळगाव येथे झालेल्या मुख्य शासकीय समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह,10 हजार रूपये.
सागर हा शिक्षण घेत असताना समाजसेवेची त्याला आवड व शिक्षण ,आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, बालविवाह निर्मुलनासाठी पथनाट्य , तंबाखू मुक्त अभियान, व आदिवासी झोपडपट्टी मधील कार्य , माता बाल आरोग्य अशा विविध विषयावर सामाजिक कार्य सागर करत असतो आणि या कार्याची दखल घेऊन सागरला महाराष्ट्र शासन जळगाव जिल्हा युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. तरी या गौरवा बद्दल सागर चे सर्वत्र कौतुक होत आहे.. यावेळी या गौरवसोहळ्याला उपस्थित जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.आयुष प्रसाद , पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल , आयुक्त,मनपा श्री.ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा क्रीडा अधिकारी. श्री रविंद्र नाईक उपस्थित होते..

