“बालवारकरी संस्कारांचे ११ दिवसांचे अध्यात्मिक शिबिर – गुरुवर्य मोठेबाबा स्मृती मंदिरात २ मे आजपासून!”
1 min read

“बालवारकरी संस्कारांचे ११ दिवसांचे अध्यात्मिक शिबिर – गुरुवर्य मोठेबाबा स्मृती मंदिरात २ मे आजपासून!”

Loading

“बालवारकरी संस्कारांचे ११ दिवसांचे अध्यात्मिक शिबिर – गुरुवर्य मोठेबाबा स्मृती मंदिरात २ मे आजपासून!”

अमळनेर प्रतिनिधी
सर्व भाविक भक्त माता भगिनी, पालकवृंद व बालगोपाळांना कळविण्यात येते की, वै. गुरुवर्य श्री गुरु मोठेबाबा स्मृती मंदिर, श्रीराम नगर, ढेकू रोड, अमळनेर येथे वर्षावारीसारखे अध्यात्मिक बालवारकरी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि. २ मे ते १२ मे २०२५ पर्यंत चालणाऱ्या या ११ दिवसांच्या निवासी शिबिरात बालवारकऱ्यांना गीतेचे श्लोक, हरीपाठ, भजन-अभंग, हनुमान चालिसा, धार्मिक स्तोत्र तथा टाळ, पखवाज वादन, दिंडी पाऊली, योगासन आणि धार्मिक कथा यांसह सखोल अध्यात्मिक ज्ञान व संस्कार दिले जातील.

या शिबिरात ह.भ.प. श्री गजानन महाराज (आळंदी), ह.भ.प. अशोक महाराज (लोंढवे), व ह.भ.प. बबनजी महाराज (पिंपळेसिम) यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचा सुसंस्कार होईल. मोबाइल-टीव्हीच्या युगात आपल्या बालकांमध्ये संस्कार रुढीसाठी अशा शिबिरांची अत्यंत गरज भासते.

शिबिर निवासी असून वय वर्ष ८ ते १५ या मर्यादित विद्यार्थ्यांचे सहभागी होणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांना संस्कार देण्यासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करून या अध्यात्मिक प्रवासाचा लाभ घ्यावा, अशी विनंती वै. गुरु मोठेबाबा स्मृती मंदिराचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ, अमळनेर यांनी केली आहे.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क करा:
श्री वाय.ए. बोर्से नाना – 9960024890
श्री हभप अशोक महाराज – 9657913031

या सुवर्णसंधीचा लाभ घ्या व आपल्या बालकांना संस्कारसंपन्न बनवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *