आळंदी संमेलनातील उज्जैनकर फाउंडेशनच्या राखीची हेरिटेज वर्ल्ड टॉप रेकॉर्डमध्ये झाली नोंद*  *१ मे रोजी मिळाले ऑनलाईन प्रमाणपत्र*
1 min read

आळंदी संमेलनातील उज्जैनकर फाउंडेशनच्या राखीची हेरिटेज वर्ल्ड टॉप रेकॉर्डमध्ये झाली नोंद* *१ मे रोजी मिळाले ऑनलाईन प्रमाणपत्र*

Loading

*आळंदी संमेलनातील उज्जैनकर फाउंडेशनच्या राखीची हेरिटेज वर्ल्ड टॉप रेकॉर्डमध्ये झाली नोंद*

*१ मे रोजी मिळाले ऑनलाईन प्रमाणपत्र*

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन हे गेल्या १५ वर्षापासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे नुकतेच ४ जानेवारी २०२५ रोजी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या सप्तशतकोत्तर जयंती महोत्सवी वर्षानिमित्त आणि आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या ७४५ व्या सप्तशतकोत्तर जयंती महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन मोरया मंगल कार्यालय, आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे या ठिकाणी ऐतिहासिक स्वरूपाचे संपन्न झाले याप्रसंगी आदिशक्ती संत मुक्ताई कडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना ७५० फूट लांब व ७५ किलो जाड वजनाची राखी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ .शिवचरण उज्जैनकर, एमआयटीच्या महासंचालिका स्वातीताई साठे, कराड व संमेलनाच्या अध्यक्ष प्रा .सुमतीताई पवार व मान्यवरांच्या शुभहस्ते या दिवशी सकाळी ठीक ८.०० वाजता संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी येथे अर्पण करण्यात आली त्यानंतर या संमेलनाच्या ग्रंथदिंडीस तेथून प्रारंभ करण्यात आला या ग्रंथ दिंडीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांनी विविध महान संतांच्या वेशभूषा करून टाळ मृदंगाच्या निनादांमध्ये ही ग्रंथदिंडी भव्य आणि दिव्य निघाली.याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी, साहित्यिक, रसिक व शिक्षक,विद्यार्थी, पत्रकार व आळंदीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही राखी एमआयटीचे संत ज्ञानेश्वर बी . एड.कॉलेजचे प्राचार्य तथा या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांच्या कल्पनेतून त्यांनी तयार केली होती. हे संमेलन ऐतिहासिक, आध्यात्मिक व विश्व रेकॉर्ड करणारे ठरले या संमेलनाला एमआयटीचे संत ज्ञानेश्वर बी . एड.कॉलेज, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती, आळंदी देवाची यांचे अनमोल सहकार्य लाभले.
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासाठी वर्षातून दोन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. हे साहित्य संमेलन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा यशस्वी आयोजित केलेले आहेत फाउंडेशन तर्फे आतापर्यंत हजारच्या वर विद्यार्थ्यांचा गौरव केलेला असून हजारच्या वर साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, शिक्षक, कलाकार आदींना तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरवलेले आहेत. नुकतेच आळंदी येथील राखी हेरिटेज वर्ल्ड टॉप रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली त्या संदर्भातील ऑनलाईन पत्र संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांना नुकतेच १ मे रोजी प्राप्त झाले यासाठी फाउंडेशनचे कार्यकारीणी सचिव तथा साहित्यिक श्री प्रमोद पिवटे कार्यकारीणी सदस्य श्री नितीन भोंबे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव श्री गणेश कोळी हे साक्षीदार आहे यापूर्वी त्यांच्या पंख पिसारा या ५१ व्यक्तींच्या व्यक्तिरेखांच्या ग्रंथास सुद्धा महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे त्यानंतर लॉकडाउनच्या काळात उज्जैनकर फाउंडेशन तर्फे ५ महिने २० दिवस १५५ मराठी व्याख्यात्यांची महा फेसबुक लाईव्ह व्याख्यान माला आयोजित करण्यात आली होती ही फेसबुक लाईव्ह महा व्याख्यानमाला सुद्धा द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने नोंदलेली होती त्याबद्दल डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील फाउंडेशनच्या विविध सन्माननीय पदाधिकाऱ्यां तर्फे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *