रवींद्र भास्कर सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी राज्यस्तरीय पुरस्कार
1 min read

रवींद्र भास्कर सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी राज्यस्तरीय पुरस्कार

Loading

रवींद्र भास्कर सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी राज्यस्तरीय पुरस्कार

 

जळगांव प्रतिनिधी

धानोरा येथील रहिवाशी नेहरू विद्यालय किनगाव ता. यावल येथील मुख्याध्यापक* साहित्यिक कादंबरीकार श्री रविंद्र भास्कर सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी राज्यस्तरीय पुरस्कार लातूर येथे मोठ्या सन्मानाने प्रदान करण्यात आला.
भटकन कादंबरीमध्ये ग्रामीण मातीशी जुळलेल्या बोलीभाषा आणि सत्य परिस्थितीवर आधारित लेखन आणि प्रतिभा यांचा योग साधत या भटकन कादंबरीने हृदयावर *भावस्पर्श* नोंदवलेला आहे. म्हणून भुकेसाठी साहित्यात लिहिण्यास खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्व दिले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचे सचिव मान. प्रकाश घादगिने तसेच समिती यांच्या आयोजनातून पुरस्कार सोहळा पार पडला. पुरस्कार वितरणाचे प्रमुख पाहुणे मान. प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के उदगीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्रात मोठ्या सन्मानाचा असून कादंबरीकार श्री रवींद्र भास्कर सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने नेहरू विद्यालयाचे चेअरमन उमाकांतजी रामराव पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयातील शिक्षक वृंद, नातेवाईक मित्र मंडळ, शांताराम वानखेडे सर, सातपुडा संस्थेचे अध्यक्ष बी एस महाजन सर, जीतू भाऊसाहेब भुसावळ, पी एस सोनवणे सर यावल, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील मुख्याध्यापक मनुदेवी. हेमंत धांडे सर यांनी शुभेच्छारूपी कौतुक केले. तसेच किनगाव येथील विद्यार्थी पालकांमध्ये सुद्धा कौतुक होत असून भटकन कादंबरी चा हा मोठा गौरवच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *