भगिनी मंडळ शाळेतील स्वराची राज्यस्तरीय परीक्षेत गगनभरारी!
![]()
भगिनी मंडळ शाळेतील स्वराची राज्यस्तरीय परीक्षेत गगनभरारी!
अमळनेर (प्रतिनिधी):-
येथील भगिनी मंडळ शाळेची ई. 1 ली ची विद्यार्थिनी स्वरा राहुल पाटील हिने विविध स्पर्धा परीक्षांत राज्य पातळीवर यश संपादन केले.
यात स्वराने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवून त्याबद्दल तिला रोख रक्कम, स्कॉलरशिप,मेडल,ट्रॉफी, प्रमाणपत्र मिळणार आहे.मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत राज्यात नववा तर जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला तसेच एक्सेलेंट ऑलिम्पियाड फाऊंडेशन या परीक्षेत 200 पैकी 190 गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे अशा रीतीने स्वराने तिन्ही परीक्षांत राज्य पातळीवर क्रमांक प्राप्त केला आहे.ती जी एस हायस्कूल चे सेवानिवृत्त शिक्षक दिलीप बहिरम यांची नात आहे. तिला शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला सोनवणे,रश्मी संवत्सरे,सविता देशमुख तसेच सर्व शिक्षिकांनी मार्गदर्शन केले.तिच्या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळ व शिक्षिकांनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

