राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा दिनेश शेलकर  तीन जिल्ह्यांच्या निरीक्षक पदाचीही मिळाली जवाबदारी
1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा दिनेश शेलकर तीन जिल्ह्यांच्या निरीक्षक पदाचीही मिळाली जवाबदारी

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा दिनेश शेलकर

तीन जिल्ह्यांच्या निरीक्षक पदाचीही मिळाली जवाबदारी

अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अमळनेर येथील प्रा दिनेश शेलकर यांची नियुक्ती करण्यात आली.
याव्यतिरिक्त ओबीसी सेलच्या जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा निरीक्षक पदी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा अंमळनेर विधानसभेचे आमदार अनिल भाईदास पाटील,माजी मंत्री कल्याण रावजी काळे,जळगाव जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले, उपविभागाचे अध्यक्ष रवींद्र पाटील इत्यादी मान्यवर मुंबई येथील पक्ष कार्यालयात उपस्थित होते.आमदार अनिल पाटील यांनी आपल्यावर विश्वास दाखवून पक्षाकडे शिफारस केली त्यामुळेच आपल्याला मोठी जवाबदारी मिळाल्याचे प्रा शेलकर यांनी सांगत आभार आमदारांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान प्रा शेलकर हे माळी समाजातील धडाडीचे कार्यकर्ते असून आमदार अनिल पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *