अमळनेर तालुक्यात महिला सरपंच पदासाठी आरक्षण पुन्हा सोडतीस – २५ एप्रिल रोजी नगर परिषद सभागृहात महत्त्वाची प्रक्रिया!
![]()
अमळनेर तालुक्यात महिला सरपंच पदासाठी आरक्षण पुन्हा सोडतीस – २५ एप्रिल रोजी नगर परिषद सभागृहात महत्त्वाची प्रक्रिया!
अमळनेर प्रतिनिधी
मा. जिल्हाधिकारी, जळगांव यांचे आदेशानुसार, अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे महिला आरक्षण पुन्हा एकदा सोडतीस घेण्यात येणार आहे. दि. २१/०४/२०२५ रोजी झालेल्या आरक्षण सोडती दरम्यान काही ग्रामपंचायतांचा स्त्री आरक्षणाचा समावेश चुकून करण्यात आला होता, ज्यामुळे त्या आरक्षण कार्यवाही रद्द करून नव्याने याची सोडती घेणे आवश्यक आहे.
या संदर्भात नामाप्र (महिला) व सर्वसाधारण (महिला) प्रवर्गातील ग्रामपंचायत सरपंच पदांचा आरक्षण दि. २५/०४/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषद सभागृह, अमळनेर येथे पुन्हा काढण्यात येणार आहे.
अमळनेर तालुक्यातील सर्व नागरीक, राजकीय पदाधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी या महत्त्वाच्या सोडतीस उपस्थित राहून सहयोग देण्याची अंतिम विनंती करण्यात येत आहे.
हा निर्णय महिला नेतृत्वाला वाढावा देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, ग्रामपंचायत स्तरावर महिलांचा सहभाग अधिक प्रबल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
– रुपेशकुमार सुराणा, तहसिलदार, अमळनेर
-संपूर्ण अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांसाठी आवाहन –
२५ एप्रिल सकाळी ११ वाजता नगर परिषद सभागृह, अमळनेर येथे जरूर उपस्थित रहा!

