जळोद जिल्हा परिषद शाळेच्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमाला दुसरा क्रमांक , जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेरची पक्षी संवाद कार्यशाळा आणि पर्यावरण संवर्धनाचा जोरदार उपक्रम
![]()
जळोद जिल्हा परिषद शाळेच्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमाला दुसरा क्रमांक
जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेरची पक्षी संवाद कार्यशाळा आणि पर्यावरण संवर्धनाचा जोरदार उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी -जळोद ता.अमळनेर येथील जिल्हा परिषदेची ही शाळा “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”या उपक्रमात जिल्ह्यात क्रमांक दोन ची शाळा ठरलेली असून यांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख रुपयाचा धनादेश सुद्धा या शाळेत देण्यात आलेला आहे. अशा या सुंदर अशा निसर्गरम्य शाळेत”जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेर “तर्फे जायंट्स,पक्षिमीत्र श्री.अश्विन पाटील सर यांनी घेतली पक्षी संवाद कार्यशाळा व मातीचे परळ वाटप.
या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट चेअरमन , जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेर चे, जायंट्स,पक्षिमीत्र श्री.अश्विन लिलाचंद पाटील सर यांनी सुमारे 200 विद्यार्थ्यांना स्मार्ट टिव्हीच्या माध्यमातून पक्षी जगता बद्दल मार्गदर्शन केले.यात पक्षी यांचा मनुष्य ,पर्यावरण,अन्नसाखळी,
जंगल निर्मिती,शेतकरी यांच्यासाठी काय योगदान आहे याचे महत्त्व पटून त्यांच्या विविध लकबी व आवाज काढून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.सदर कार्यक्रम प्रसंगी जायंट्स ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष जायंट्स डॉ.सुनिल पाटील, सचिव जायंट्स संदीप महाजन, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, मार्गदर्शक जायंट्स प्रवीण भावसार सर, अॅड राजेंद्र चौधरी, रमेश महाजन, व सदस्य प्रदीप शिंगाणे, रवींद्र पाटील या सदस्यांनी या कामात सहकार्य करून उपक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमा नंतर उपस्थित विद्यार्थ्यांना पक्षांना उन्हाळ्यात थंड पाणी मिळावे यासाठी १०५ मातीचे भांडे (परळ) गृपतर्फे वाटप करण्यात आले.

सदर उपक्रममाच्या सुरुवातीस जळोद गावातील प्रथम नागरीक सरपंच सौ.कल्पनाताई भिमराव चौधरी यांच्याकडून खमंग असा आल्पोपआहार देण्यात आला.
तसेच जळोद येथील सरपंच सौ.कल्पनाताई भिमराव चौधरी ,जि.प.जळोद शाळेतील कार्यरत शिक्षक ज्ञानेश्वर भाईदास कुवर (मुख्याध्यापक), सुनिल श्रावण पाटील, नरेश आत्माराम शिरसाठ, सदाशिव पौलाद पवार, सुरेखा यशवंत पाटील, जयश्री दिलीप पवार, कल्पना प्रकाश पवार व यांनी अनमोल सहकार्य केले.तदनंतर जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेर च्या वतीने या सर्व शिक्षकांचे, तसेच शालेय स्थानिक समिती अध्यक्ष सतीलालभोई, व दीपक चौधरी यांचे ही आभार मानण्यात आले. सदर असले उपक्रम हे गृपला जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन कडून कुठलेही अनुदान प्राप्त होत नाही तरी सुद्धा सर्व सदस्य सहभाग रक्कम गोळा करून नव नवीन उपक्रम जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे मागील दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहेत त्याचा समाजातील सर्व घटकांना फायदा होत आहे.

