चार्ली स्पेन्सर चॅप्लीन यांची १३६ व्या जयंती निमित्त माणुसकी वृध्द सेवालयाच्या वतीने अभिवादन  ज्युनिअर चार्ली फाउंडेशन व सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने चार्ली स्पेन्सर चॅप्लीन यांना अभिवादन
1 min read

चार्ली स्पेन्सर चॅप्लीन यांची १३६ व्या जयंती निमित्त माणुसकी वृध्द सेवालयाच्या वतीने अभिवादन ज्युनिअर चार्ली फाउंडेशन व सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने चार्ली स्पेन्सर चॅप्लीन यांना अभिवादन

Loading

चार्ली स्पेन्सर चॅप्लीन यांची १३६ व्या जयंती निमित्त माणुसकी वृध्द सेवालयाच्या वतीने अभिवादन

ज्युनिअर चार्ली फाउंडेशन व सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने चार्ली स्पेन्सर चॅप्लीन यांना अभिवादन

कल खेल मे हम रहे ना रहे..
गर्दीश मे तारे रहेंगे सदा…..
ह्या दोन ओळीचा अर्थ सहज समजल्या जाईल एवढा सोपा नाही त्याचे कारण नाही तेवढेच आहे आज चॅप्लिनचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडनमध्ये झाला.हसून हसून पोट दुखणे म्हणजे काय असते हे अनुभवायचे असेल तर चार्ली चॅप्लिनचा कुठलाही चित्रपट पाहा. जगाला पोट दुखेपर्यंत हसवणार्‍या चार्ली चॅप्लिनला आजही कुणी विसरलेला नाही.गंमत पाहा चार्लीचा काळ मूकपटांचा होता.त्यामुळे केवळ अभिनयातून त्याने सर्वांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले होते,आनंद दिला होता.आजही चार्ली चॅप्लिनचे नाव घेतले तरी नकळत चेहरा आनंदाने फुलतो. चित्रपट बोलू लागल्यानंतर भाषा हा चित्रपटाचा आत्मा झाला.हे लक्षात घेतले तर संवादाशिवाय केवळ देहबोली आणि चेहर्‍यावरील हावभावाने प्रेक्षकांना हसवणे आणि हसवता हसवता कारुण्याची झलक दाखवण्याची जबरदस्त किमया त्याकाळी चार्ली चॅप्लिनने केली होती. अशा या चार्लीने २५ डिसेंबर १९७७ रोजी जगाचा निरोप घेतला. ४८ वर्षांनंतरही चार्लीला लोक विसरू शकले नाहीत आणि येणारी नवी पिढीही चार्लीकडे आकर्षित होते.एवढी लोकप्रियता क्वचितच कुठल्या कलाकाराला मिळाली असेल. अभिनय त्याच्या रक्तातच भिनला होता. कारण त्याचे आईवडील रंगभूमी कलाकार होते. चार्ली अवघ्या १२ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे मृत्यू झाला होता. तत्पूर्वी त्याचे आईवडील वेगळे झाले होते. त्यामुळे सर्व जबाबदारी आईवर आली होती.
त्यांच्याकडे पूर्ण विश्वातील मोठ मोठे डायरेक्टर प्रोडूसर आपल्या येथील ख्यातनाम कलाकार त्यांच्याकडे चित्रपट सृष्टीचे धडे गिरवत असत.आजही ते जरी या विश्वात शरीरुपे नसले तरीही त्यांनी केलेली कार्यकर्ती ही संपूर्ण चित्रपट सृष्टीला धडा देणारी आहे व तसेच कित्येक जण आज त्यांची वेशभूषा करून आत्मनिर्भर होत आहे त्यांचीच आम्ही ज्युनिअर चार्ली फाउंडेशन व माणुसकी वृध्द सेवालयाच्या वतीने चार्ली स्पेन्सर चॅप्लीन यांची १३६ व्या जयंती निमित्त माणुसकी वृध्द सेवालयाच्या वतीने अभिवादन करीत जयंती साजरी केली.
ज्युनियर चार्ली फाउंडेशन हे चार्ली सरांच्या पाऊलखुणावर चालत आहे सध्या ज्युनिअर चार्ली फाउंडेशनचे ३५ विद्यार्थी चार्ली च्या भूमिकेत आपली कला सादर करुन आपली उपजीविका भागवत आहे तसेच ज्युनिअर चार्ली फाउंडेशन हे आज पासून *चार्ली इज बॅक*
विश्व जनजागरण २०२५ ही मोहीम देखील सुरू करत आहे. चार्ली यांच्या आत्म्याला शांती लाभो व आमच्याकडून चार्ली भूमिकेत कोणतेही वाईट कृत्य घडू नये आणि आम्ही सर्वांना क्षणभर का होईना हसू शकू हीच प्रभु चरणी प्रार्थना ज्युनिअर चार्ली फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र तथा भारतभर कार्य करीत आहे यावेळी ज्युनियर चार्ली फाउंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ स्वभावणे व सुमित पंडित यांनी उपस्थीतांना चार्ली च्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी प्रा.शरद सोनवणे यांनी प्रतीमा पुजन करुन चार्ली यांचा जीवन पट मांडला यावेळी माणुसकी वृध्द सेवालयाच्या संचालीका पुजा पंडित,मिराबाई पंडित, देविदास पंडित,आकाश गोरे,अशोक ग्राम, लक्ष्मी पंडित,विजय निंबाळकर,वृध्द सेवालयातील वृध्द उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *