शिर्डी येथील एका भाविकाकडून मंगळग्रह मंदिरास एक लाख ३५ हजाराचे चांदीचे चरण भेट
1 min read

शिर्डी येथील एका भाविकाकडून मंगळग्रह मंदिरास एक लाख ३५ हजाराचे चांदीचे चरण भेट

Loading

शिर्डी येथील एका भाविकाकडून मंगळग्रह मंदिरास एक लाख ३५ हजाराचे चांदीचे चरण भेट

अमळनेर  प्रतिनिधी

येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिराची महती पाहता देशभरातील भाविक याठिकाणी भेट देत असतात. शिर्डी येथील एका भाविकाने त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याने श्री मंगळग्रह मंदिराला १ किलो २०० ग्राम वजनाचे १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे चरण भेट दिले.
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिराला अति प्राचीन, अति दुर्मिळ आणि अति जागृत देवस्थान मानले जाते. या चमत्कारिक मंदिरात विविध क्षेत्रातील भाविक लाखोच्या संख्येने येऊन अभिषेक, पूजा करत असतात.
शिर्डी येथील अशाच एका उद्योजक भाविकाने काही महिन्यांपूर्वी मंदिराला भेट देऊन अभिषेक केला होता. त्यानंतर त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याने त्यांनी मंगळग्रह मंदिराला मंगळवारी, १५ रोजी भेट देऊन चांदीचे चरण भेट दिले.
मंदिर प्रशासनातर्फे संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, बाळा पवार आदींनी त्यांचे स्वागत करुन यथोचित सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *