सुरेश अहिरे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान!!!
1 min read

सुरेश अहिरे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान!!!

Loading

सुरेश अहिरे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान!!!

भुसावळ तालुक्यातील तळवेल गावातील नेहरू विद्यालयातील उपक्रमशील मुख्याध्यापक माननीय सुरेश अहिरे सर यांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. माननीय सुरेश अहिरे सर शिक्षक परिषदेचे जुने कार्यकर्ते आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. सुरेश अहिरे सरांनी अनेक प्रशिक्षणांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे. अगदी शिस्तबद्ध, काटेकोर प्रामाणिक असे त्यांचे काम आहे. गणित ,विज्ञान विषयाच्या नाविन्यपूर्ण कल्पना त्यांनी आपल्या अध्यापनात मांडलेल्या आहेत. मुख्याध्यापक संघाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे भाजलेल्या अधिवेशनामध्ये शिक्षक आमदारांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर शिक्षक एक उत्तम प्रतीचे समुपदेशक आहेत. सेवांतर्गत प्रशिक्षणात त्यांनी चांगल्या प्रकारचे योगदान दिलेले आहे. मुख्याध्यापकांच्या अडीअडचणी नेहमी ते सोडवित आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *