बाबासाहेबांची जलनीती देशाला सुजलाम सुफलाम बनविल -जयसिंग वाघ
1 min read

बाबासाहेबांची जलनीती देशाला सुजलाम सुफलाम बनविल -जयसिंग वाघ

Loading

बाबासाहेबांची जलनीती देशाला सुजलाम सुफलाम बनविल : जयसिंग वाघ

भुसावळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शंभर वर्षांच्या पुढचा वेध घेणारे दृष्ट्ये नेते होते , त्यांनी मजूर मंत्री असताना काही मोठ्या नद्यांवर धरणं बांधली , जल विद्युत प्रकल्प उभे केले , नदीजोड प्रकल्प राबविले , लाखो एकर शेती ओलिताखाली आणली , शेती करिता पुरेसे पाणी व वीज उपलब्ध करून दिले त्यामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती घडून आली त्यांची जलनीती आजही सरकारने वापरली तर देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असे अभ्यासपूर्ण विचार ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले .
भुसावळ रेल मेल सर्व्हिस कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यवक्ता म्हणून भाषण करतांना ते बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की , भारतात आजही शेतकरी आत्महत्या करत आहेत , कुपोषण मोठ्याप्रमाणात आहे , भूकबळी लोकांची संख्या वाढत आहे , शेतीचे क्षेत्र कमी करून काँक्रीटीकरण वाढविले जात आहे यामुळे देश अधोगतीकडे जात आहे , बाबासाहेबांची जलनीती स्वीकारून शेती व्यवसायास चालना दिली तर भारत सुजलाम , सुफलाम होईल व भारताची ओळख एक सोनेकी चिडिया म्हणून होईल .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. डी. शिंगणे होते त्यांनी बाबासाहेबांनी दिलेला शिका , संघटित व्हा , संघर्ष करा हा संदेश प्रत्येकाने अंगिकारावा असे आवाहन केले .
संजय बोपले , सुमंगल अहिरे , एस. आय . पठाण , युवराज नरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद गुरचळ , प्रास्ताविक योगिता जांभूळकर , परिचय एस. डी. कोल्हेकर तर आभारप्रदर्शन बी. आर. बाविस्कर यांनी केले .
कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास राजन बाविस्कर , विनोद मेघे , भीमराव शिंदे , मीना मेश्राम , रवींद्र अडकमोल , अक्रम पिंजारी आदींसह अधिकारी , कर्मचारी मोठ्यासंख्येने हजर होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *