डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन
![]()
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर, 14 एप्रिल – पूज्य साने गुरुजी ग्रंथालय आणि मोफत वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. हा समारंभ सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता आणि बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देणारा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून करण्यात आली, ज्यामध्ये आरोग्य विभागाचे माननीय श्री प्रवीण मांडके सर विशेष रूपाने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुमित धाडकर यांनी केले.
या कार्यक्रमात ग्राहक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर,सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप राजाराम सोनवणे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. माधुरी मनोहर भंडारकर, सहचिटणीस सुमित मुकुंद कुलकर्णी, विश्वस्त चंद्रकांत शांताराम नागावकर, ज्येष्ठ संचालक भीमराव साहेबराव जाधव, आणि प्रसाद प्रभाकर जोशी
ग्रंथालयाचे कर्मचारी मधुकर बाळापुरे उपस्थित होते.
यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. वाचनालयामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक पुस्तकांचा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या विचारांचा अधिक प्रसार होणार आहे.
या समारंभाचा समारोप जेष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी आभार प्रदर्शन करून केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आल्याने या कार्यक्रमाने सर्व उपस्थितांच्या मनात एक सकारात्मक प्रेरणा जागवली आहे.

