देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस अभिवादन
1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस अभिवादन

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
शाळेचे ज्येष्ठ तथा क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी बाबासाहेबांचे विचार आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारे ठरत असल्याचे सांगितले. “शिका संघटित व्हा संघर्ष करा” हे बाबासाहेबांचे मंत्र आजच्या युवा वर्गासाठी मार्गदर्शक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्काऊट शिक्षक एच.ओ. माळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर मौलिक प्रकाश टाकत, त्यांच्या कार्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
अध्यक्षीय भाषणात अनिल महाजन यांनी बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले असून, आज भारतीय संविधानावर संपूर्ण देश चालतो, यावर विशेष प्रकाश टाकला. “आपल्या संविधानाचे अनेक देशांनी अवलोकन केले आहे. हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सुत्रसंचलन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर. महाजन यांनी केले. आभार प्रदर्शन स्काऊट शिक्षक एस.के. महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील आणि संभाजीराव पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *