जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन माझ्यावरच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला -नरेश पाटील
1 min read

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन माझ्यावरच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला -नरेश पाटील

Loading

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन माझ्यावरच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला -नरेश पाटील

अमळनेर : ट्रॅक्टर व्यवसायावरुन नरेश महारु पाटील याला खंडेराव चुडामन पाटील, प्रशांत सुनिल पाटील, संदीप खंडेराव पाटील आणि सुनिल चुडामन पाटील यांनी लोखंडी टॅमी, सळई व रॉडने मारहाण करुन जबर जखमी केले. अर्थात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची तिव्रता कमी करण्यासाठी मलाच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन आणि माझ्यावरच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे लोण बु. येथील नरेश महारु पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
सविस्तर वृत्त असे की, 29 मार्च रोजी नरेश महारू पाटील हा घरगुती कार्यक्रमासाठी लोण पंचम येथे गेला असता त्याच्या पत्नीने फोन करून कळवले की, शेजारी राहणारे खंडेराव चुडामन पाटील, प्रशांत सुनील पाटील, संदीप खंडेराव पाटील व सुनील चुडामन पाटील हे घरावर दगडफेक करत असून शिवीगाळ करीत आहेत. नरेश हा घरी पोहचला असता प्रशांत याने माझ्या पतीला का त्रास देतो असे म्हणत लोखंडी टॅमीने डोक्यावर मारले. खंडेराव व सुनील यांनी लोखंडी सळई व रॉडने मारहाण केली तसेच संदीप याने लाकडी काठीने मारहाण करत असताना फिर्यादीच्या साडूने त्याची सोडवणूक करत त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले होत्ो. उपचारादरम्यान दिलेल्या जबाबानुसार वरील नमूद चौघांविरुद्ध मारवड पोलिसांत कलम 109, 115, 3(5), 352, 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.
गुन्ह्याचे गांभीर्य पाहता गुन्ह्याची तिव्रता कमी व्हावी म्हणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचे नरेश पाटील याचे म्हणणे आहे. दाखल गुन्ह्यात म्हटले आहे की, 29 रोजी सायंकाळी 7:30 वाजता एक महिला घरी असताना शेजारी राहणारा नरेश महारू पाटील हा बळजबरी घरात घुसला आणि सदर महिलेला पकडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत करू लागला. तिचे तोंड दाबून तुला नंतर पाहतो, असे म्हणत कोणाला सांगितले तर पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेचा आवाज ऐकून तिची मुले व पती घरात आल्याने नरेश व महिलेच्या पतीची झटापट झाली. त्यावेळी नरेश पळून जात असताना पाय घसरून पडल्याने डोक्याला दुखापत झाली. या प्रकाराने महिला घाबरून गेल्याने उशिराने मारवड पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत.
नरेश व महिलेच्या पतीची झटापट झाली. त्यावेळी नरेश पळून जात असताना पाय घसरून पडल्याने डोक्याला दुखापत झाली. असे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मात्र नरेशच्या सांगण्यावरुन डोक्यावर व अंगावर खोलवर झालेल्या जखमा ह्या पाय घसरुन पडून नव्हे तर ट्रॅक्टर व्यवसायाच्या द्वेषापोटी झालेल्या मारहाणीतून पडल्या आहेत. शिवाय एवढा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल असूनही आरोपी अद्यापही मोकाट आहेत, असेही नरेशचे म्हणणे आहे.

दोन्ही गटांची फिर्याद दाखल केली असून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा योग्य पद्धतीने तपास सुरू असून तपासाअंती दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
-पीएसआय विनोद पाटील, तपासाधिकारी, मारवड पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *