कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा कोकण दौरा संपन्न* *कोकण विभागातील शैक्षणिक समस्या वर विविध पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा.*
![]()
*कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा कोकण दौरा संपन्न*
*कोकण विभागातील शैक्षणिक समस्या वर विविध पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा.*
*ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)आज कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे *आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शिंपी मॅडम जिल्हापरिषद ,सिंधुदुर्ग यांची भेट घेतली . सुमारे 60 शिक्षक शिक्षकेतरांचे प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून , एक आठवड्याच्या आत सर्व कामे पूर्ण करा असा आदेश दिला . मुख्याध्यापक मान्यता, पर्यवेक्षक मान्यता, फरक बिले, मेडिकल बिले , शालार्थ आयडी,अनुकंप मान्यता , शिक्षकेतर कर्मचारी समायोजन, सेवानिवृत्त कर्मचारी प्रश्न इत्यादी विषय प्रामुख्याने चर्चेत घेतले*
*यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम.कविता शिंपी मॅडम , पे युनिट अधीक्षक श्री.मुक्तेश्वर छडीदार सर, मुख्याध्यापक संघाचे श्री. तोडणकर सर,, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शश्री.साळवी सर, सचिव श्री सुभाष खरात,परब सर, गव्हाणकर सर,चव्हाण सर , चोरघे सर ,करडे सर,राहुल कदम ,राहुल चौगुले , सावंत मॅडम, कीर्ती भोगटे मॅडम व अन्य शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.*
तसेच जिल्हा नियोजन बैठकीमध्ये प्रतिक्षा यादीत असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांच्या तात्काळ नियुक्त झाल्या पाहिजेत अशी मागणी केली, तसेच 15. 3.2024 च्या संच मान्यता शासन आदेशान बदल केला नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीड हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतील, पालकमंत्री नितेशजी राणे, खासदार नारायणजी राणे, आमदार निलेश राणे साहेब. यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी, व शिक्षण मंत्र्यांशी हा विषय बोलून निकष बदलून घेण्यासाठी प्रयत्न करावा, सदरचा प्रश्न मी ऑलरेडी विधिमंडळामध्ये मांडलेला आहे अशी विनंती केली आहे
अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सचिव सुभाष खरात यांच्याकडून देण्यात आली आहे.

