५व्या अहिरानी साहित्य संमेलनात जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेरचा खास उपक्रम
![]()
५व्या अहिरानी साहित्य संमेलनात जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेरचा खास उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेरच्या वतीने ५व्या अहिरानी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीत उपस्थित व्यक्तींना “मसाला ताक” वाटप करण्यात आले.
दिनांक ३० मार्च (गुढीपाडवा) रोजी संपन्न झालेल्या या ग्रंथ दिंडीत, जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेरने ३५० व्यक्तींना उन्हाच्या तीव्रतेमुळे थंड मसाला ताक पाउच वाटप करून त्यांच्या तृष्णा तृप्त करण्याचा प्रयत्न केला. यामुळे उपस्थित व्यक्तींमध्ये आनंद आणि ताजगीची अनुभूती झाली.
मुख्य आयोजक प्रा. लिलाधर पाटील,प्रा अशोक पवार, व समितीच्या पदाधिकारी
यांच्या तर्फे या उपक्रमाला समर्थन करतांना जायंट्स ग्रूपचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये जायंट्स संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र भावसार, सेक्रेटरी संदीप महाजन, सदस्य रविंद्र पाटील, महेश पाटील, आश्विन पाटील, प्रदीप शिंगाणे, मार्गदर्शक ॲड राजेंद्र चौधरी, चंदुलाल बडगुजर, पी आर भावसार सर, आणि रमेश महाजन उपस्थित होते.
या उपक्रमाने साहित्य संमेलनाच्या आनंदात भर टाकला आणि सर्व उपस्थितांना चांगला अनुभव दिला.


