शिक्षण संस्था चालकांच्या समस्या सोडविण्यास वचनबध्द – शिक्षक आमदार सुधाकर आडबोले.
1 min read

शिक्षण संस्था चालकांच्या समस्या सोडविण्यास वचनबध्द – शिक्षक आमदार सुधाकर आडबोले.

Loading

शिक्षण संस्था चालकांच्या समस्या सोडविण्यास वचनबध्द – शिक्षक आमदार सुधाकर आडबोले.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राज्यातील शिक्षण संस्था चालकांच्या समस्यांविषयी मी अवगत असून सदर समस्या सोडविण्यासाठी संस्था चालकांसोबत असून त्यांच्या निराकरणासाठी कटिबध्द आहे असे शिक्षक आमदार सुधाकर आडबोले यांनी राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे नाशिक जिल्ह्याचे समन्वयक श्री.नांद्रे सर व जळगाव जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाचे समन्वयक प्रा.सुनील गरुड यांना सांगितले. ते काल दि. 31 मार्च 2025 रोजी राज्य माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या मिटिंग निमित्ताने जळगाव येथे आले असता त्यांचा राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री श्री. विजय नवल पाटील यांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कार्याविषयी अवगत करून शिक्षण संस्थांच्या प्रमुख समस्या विशेषतः वेतनेतर अनुदान, पवित्र पोर्टल व त्यासंबंधीच्या अडचणी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी उठविणे या प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी माजी शिक्षक आमदार श्री.विश्वनाथ डायगव्हाणे देखील उपस्थित होते.शिक्षण संस्था चालकांच्या विविध प्रश्नांवर सभागृहात वाचा फोडेल असे आमदार सुधाकर आडबोले यांनी आश्वासित केले. याप्रसंगी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष श्री.एस.डी. भिरुड, श्री.आर.एस. बाविस्कर व भुसावळ माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.गोपाळ पाटील,संचालक श्री.गोपाळ महाजन यांच्यासह विविध शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *