अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आदिवासी अध्ययन यावर राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग
1 min read

अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आदिवासी अध्ययन यावर राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग

Loading

अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आदिवासी अध्ययन यावर राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग

अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आयोजित “दोन दिवसीय आदिवासी अध्ययन पद्धती व तंत्र राष्ट्रीय कार्यशाळा’ यामध्ये सहभाग नोंदविला आहे .
एकलव्य अकॅडमी नंदुरबार या विद्यापीठाच्या संकुलाने सदर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा डॉ अशोक उईके यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू , प्र कुलगुरू , विभाग प्रमुख विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शक यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पद्मश्री चैतराम पवार यांची प्रकट मुलाखत झाली याशिवाय महाराष्ट्रातील व देशातील नामवंत विचारवंत यांचे मार्गदर्शन संशोधक प्राध्यापक विद्यार्थी यांना लाभत आहे.
सदर कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर किशोर पवार यांनी पीएम उषा उपक्रमांतर्गत विद्यापीठांमध्ये या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले.

श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस .पाटील व प्रा. विजयकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या एकूण तेरा विद्यार्थिनी व तीन विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *