राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेस विकल्प निवडीसाठी एक वर्षाची मुदतवाढ*  *अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश*
1 min read

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेस विकल्प निवडीसाठी एक वर्षाची मुदतवाढ* *अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश*

Loading

*राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेस विकल्प निवडीसाठी एक वर्षाची मुदतवाढ*

*अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश*

(मनिलाल शिंपी) राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या विकल्पाला एक वर्षाची मुदतवाढ दिली असून मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे
याबाबत आज महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने शासन निर्णय निर्गमित करून ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे
सदर योजनांच्या अंमलबजावणी बाबतीत सर्वदूर महाराष्ट्रात संभ्रमावस्था निर्माण झाली होती त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री तसेच राज्याच्या प्रधान सचिवांकडे निवेदन देऊन केली होती
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. 31 मार्च 2025 पर्यंत विकल्प दिले गेले पाहिजेत अशा आशयाचे आदेश 13 मार्च 2025 रोजी होते हा कालावधी खूपच कमी होता त्यातच या योजनेबाबत राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *